पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

फलनिष्पत्ती : स्वित्झर्लंडच्या राष्ट्राध्यक्षांचा भारत दौरा

Posted On: 05 OCT 2026 5:14PM by PIB Mumbai

  

नवी दिल्ली,5 ऑक्टोबर 2026

सामंजस्य करार/स्वारस्यपत्र/करार 

क्र 

निष्पत्ती

विवरण 

1.

स्थलांतर आणि गतिशीलता भागीदारीवर (MMP) सामंजस्य करार 

समान वागणूक तत्त्वांअंतर्गत स्थलांतर आणि गमनशीलता सहकार्य विकसित करणे, राष्ट्रीय कायद्यांनुरूप अनियमित  स्थलांतर, मानवी शोषण आणि मानवी तस्करी रोखणे व त्याविरुद्ध लढा देणे, हा या सामंजस्य कराराचा उद्देश आहे.  यात 5  वर्षांपर्यंत बहु प्रवेश  व्हिसाची तरतूद असून प्रत्येक भेटीत  6  महिन्यांपर्यंतच्या मुक्कामाचा अंतर्भाव आहे. तसेच नूतनीकरणक्षम  1   वर्षाच्या विद्यार्थी परवान्यांची तरतूदही यात आहे

2.

युवा व्यावसायिक आदानप्रदान करार  (YPS)

आपापल्या क्षेत्रातील व्यावसायिक आणि भाषिक कौशल्ये वाढवण्यासाठी दुसऱ्या देशात तात्पुरता रोजगार स्वीकारणाऱ्या युवा व्यावसायिकांच्या आदानप्रदानासंदर्भात नियमन, हा या कराराचा उद्देश आहे.  यात वर्षाला प्रति देश 300 व्यक्तींचे आदानप्रदान, जे 500 पर्यंत वाढू शकते आणि राष्ट्रीयत्व/निवासी दर्जाच्या पडताळणीसाठी 30/90 दिवसांचा कालावधी, यांसारख्या तरतुदींचा अंतर्भाव आहे. 

3.

फेडरल डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक अफेअर्स, एज्युकेशन अँड रिसर्च (EAER) आणि रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालय यांच्यात विशिष्ट क्षेत्रांमधील वाहतूक तंत्रज्ञान, गतिशीलता प्रणाली आणि पायाभूत सुविधा, यांवरील सहयोग आणि चालना  याबाबत सामंजस्य करार 

शाश्वत पायाभूत सुविधा विकासात सहयोगाला चालना देणे, हा या कराराचा उद्देश आहे. याअंतर्गत इलेक्ट्रिक वाहने, रोपवे, चक्राकार अर्थव्यवस्था, बोगदे आणि वाहतूक क्षेत्रातील इतर बाबींमध्ये तंत्रज्ञान व पायाभूत सुविधा पुढे नेण्यासह वाहतूक आणि गतिशीलता प्रणालींवर विशेष भर देण्यात आला आहे.  

4.

स्विस नॅशनल सायन्स फाउंडेशन (SNSF) आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग (DST) यांच्यात इरादापत्र(LoI).  

भारतीय आणि स्विस समुदायांमध्ये दीर्घकालीन सहकार्याला प्रोत्साहन देणे, हा या इरादापत्राचा उद्देश आहे.  अन्वेषणात्मक वैज्ञानिक सहयोगाला पाठबळ, भविष्यातील संयुक्त संशोधनासाठी भागीदारी उभारणे आणि परस्पर संमत प्राधान्य क्षेत्रांमध्ये दीर्घकालीन उपक्रम टिकवून ठेवण्यासाठी एक व्यापक चौकट स्थापित करणे, या बाबींचा यात समावेश आहे.  

5.

विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग (DST) आणि झ्युरिक युनिव्हर्सिटी ऑफ अप्लाइड सायन्सेस यांच्यात नवोन्मेष,तंत्रज्ञान हस्तांतरण आणि उद्योजकता क्षेत्रातील सहकार्यासाठी  अंमलबजावणी व्यवस्था(IA). 

अंमलबजावणी व्यवस्थेचा उद्देश द्विपक्षीय आदानप्रदान, संयुक्त कार्यशाळा, क्षमता बांधणी आणि नेटवर्किंगच्या माध्यमातून सुरुवातीच्या टप्प्यातील स्टार्टअप्ससाठी 'इंडो-स्विस अकॅडेमिया-इंडस्ट्री ट्रेनिंग' (AIT India) कार्यक्रम राबवून नवोन्मेष, तंत्रज्ञान हस्तांतरण आणि उद्योजकता या क्षेत्रांत द्विपक्षीय सहकार्य प्रस्थापित करणे हा आहे. 

 

II. घोषणा 

क्र 

घोषणा 

1.  

विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या सहयोगाने  इंडो-स्विस रिसर्च फ्लॅगशिप कार्यक्रमाचे उद्घाटन सत्र

 
निलिमा चितळे/सोनाली काकडे/प्रिती मालंडकर 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

  


(Release ID: 2319285) अभ्यागत कक्ष : 7