पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांनी स्वातंत्र्यसैनिक श्यामजी कृष्ण वर्मा यांच्या जयंतीनिमित्त त्यांना वाहिली आदरांजली

Posted On: 04 OCT 2026 8:42AM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महान क्रांतिकारक आणि स्वातंत्र्यसैनिक श्यामजी कृष्ण वर्मा यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली. पंतप्रधानांनी सांगितले की, भारतमातेच्या पारतंत्र्याच्या बेड्या तोडण्यासाठी श्यामजी कृष्ण वर्मा यांनी आपले जीवन समर्पित केले.

ते म्हणाले की, मातृभूमीच्या स्वाभिमानाचे रक्षण करण्यासाठी त्यांनी दाखवलेले शौर्य आणि समर्पण देश कधीही विसरू शकत नाही.

मोदी यांनी ‘एक्स’वर लिहिले; “महान क्रांतिकारी आणि स्वातंत्र्यसैनिक श्यामजी कृष्ण वर्मा यांना त्यांच्या जयंतीनिमित्त सादर नमन. भारतमातेच्या पारतंत्र्याच्या बेड्या तोडण्यासाठी त्यांनी आपले जीवन समर्पित केले. मातृभूमीच्या स्वाभिमानाच्या रक्षणासाठी त्यांनी जो पराक्रम आणि पुरुषार्थ दाखवला, तो कृतज्ञ राष्ट्र कधीही विसरू शकत नाही.”

***

आशिष सांगळे/हेमांगी कुलकर्णी/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2318826) अभ्यागत कक्ष : 9