इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारताच्या पहिल्या 5.56 किमी 'फ्री-स्पेस क्वांटम की डिस्ट्रिब्युशन' लिंकचे प्रात्यक्षिक सादर

Posted On: 03 OCT 2026 4:44PM by PIB Mumbai


नवी दिल्ली, 3  ऑक्टोबर 2026

QNu Labs ने 'भास्कराचार्य नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर स्पेस ॲप्लिकेशन्स अँड जिओ-इन्फॉर्मेटिक्स' (BISAG-N) आणि 'आयआयटी गांधीनगर' यांच्या सहकार्याने, 5.56 किमी अंतरावरील भारतातील पहिल्या 'फ्री-स्पेस क्वांटम की डिस्ट्रिब्युशन' (QKD) लिंकचे (विना-केबल सुरक्षित माहिती आदान-प्रदान करण्याचे एक प्रगत तंत्रज्ञनाचे) यशस्वी प्रात्यक्षिक सादर केले.

"27-28 सप्टेंबरच्या रात्री घेण्यात आलेल्या या प्रत्यक्ष जागेवरील  चाचणीमध्ये , BISAG-N आणि IIT Gandhinagar दरम्यान एक अतिशय सुरक्षित 'क्वांटम कम्युनिकेशन चॅनेल' (संवाद माध्यम) यशस्वीरित्या प्रस्थापित करण्यात आले. या प्रयोगात QNu Labs च्या प्रगत 'पॉइंटिंग, अ‍ॅक्विझिशन अँड ट्रॅकिंग' (Pointing, Acquisition and Tracking) प्रणालीचा वापर करण्यात आला. या प्रणालीमुळे क्वांटम बिट एरर रेट (Quantum Bit Error Rate - QBER) 5% पेक्षा कमी राखण्यात यश आले, जो अत्यंत स्थिर मानला जातो. तसेच, याद्वारे प्रति सेकंद 230 ते 260 बिट्स (230–260 bps) या वेगाने सुरक्षित डिजिटल चाव्या (Secure Keys) तयार करण्यात आल्या.

या तयार झालेल्या सुरक्षित Keys BISAG-N च्या 'वैदिक कवच' या 'पोस्ट क्वांटम क्रिप्टोग्राफी' सक्षम प्लॅटफॉर्मशी जोडल्या गेल्या. यामुळे चाचणीसाठी पाठवलेले संदेश सुरुवातीपासून शेवटपर्यंत (End-to-End) यशस्वीरित्या सुरक्षित कोडमध्ये बदलणे (Encrypt)  आणि मूळ संदेशात परत आणणे (Decrypt) करणे शक्य झाले.

या प्रात्यक्षिकात क्वांटम सुरक्षेचे दोन पूरक स्तर एकत्र आणले गेले: QNu लॅब्सचे हार्डवेअर-आधारित QKD उपकरण 'आर्मोस' जे मुक्त अवकाशातील ऑप्टिकल चॅनेलवर चालते आणि BISAG N चे 'वेदिक कवच' सॉफ्टवेअर-आधारित पोस्ट-क्वांटम क्रिप्टोग्राफी, ज्यात कोणत्याही क्वांटम  संख्या निर्मितीचा समावेश आहे. ही एकात्मिक रचना भौतिक क्वांटम चॅनेल तात्पुरते अनुपलब्ध असले तरीही त्याच्याशी सुसंगती सुनिश्चित करते.

BISAG-N चे महासंचालक डॉ. विनय ठाकूर यांनी सांगितले की, वैदिक कवचचे QNu लॅब्सच्या QKD तंत्रज्ञानासोबतचे एकत्रीकरण हे व्यावहारिक क्वांटम रेझिलिएंट कम्युनिकेशन सिस्टीमच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.

QNu Labs चे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील गुप्ता यांनी विशेषत्वाने नमूद केले की, 5.56 किलोमीटर  अंतरावरील यशस्वी प्रात्यक्षिकामुळे अधिक अंतरावरील 'क्वांटम सुरक्षित नेटवर्क्स' आणि उपग्रहावर आधारित 'क्वांटम कम्युनिकेशन'चा मार्ग मोकळा झाला आहे.

ही चाचणी अर्थात प्रात्यक्षिक,  सुरक्षित दळणवळण पायाभूत सुविधांमधील भारताची क्षमता वाढवण्यासाठी आणि क्वांटम युगातील सुरक्षाविषयक नव्या संभाव्य  धोक्यांविरुद्धचे अनुकूलन मजबूत   करण्यासाठी एक पाया उपलब्ध करून देते.

BISAG-N ('भास्कराचार्य नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर स्पेस ॲप्लिकेशन्स अँड जिओ-इन्फॉर्मेटिक्स) बद्दल: ईलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या (MeitY) च्या अंतर्गत असलेली ही एक स्वायत्त वैज्ञानिक संस्था असून, ती, अवकाश तंत्रज्ञानाचे व्यावहारिक उपयोग,  उपग्रह संचार, भू-माहितीशास्त्र या क्षेत्रात काम करते आणि तंत्रज्ञान-आधारित प्रशासनाला चालना देते.

QNu Labs बद्दल: 2016 मध्ये स्थापन करण्यात आलेली, क्यूएनयू लॅब्स ही क्वांटम सुरक्षित डिजिटल पायाभूत सुविधांमधील भारतातील अग्रणी कंपनी असून, ती जागतिक स्तरावर वापरली जाणारी स्वतःची डिजिटल उत्पादने आणि उपाय प्रदान करते.

***

सुषमा काणे/सविता म्हसकर/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2318696) अभ्यागत कक्ष : 9