कृषी मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

स्वच्छतेला केवळ मोहिमांपुरते मर्यादित न ठेवता, ती दैनंदिन सार्वजनिक वर्तणुकीचा भाग बनवण्याचे शिवराज सिंह चौहान यांचे आवाहन

Posted On: 01 OCT 2026 7:48PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 1 ऑक्‍टोबर 2026

 

स्वच्छता केवळ एखाद्या मोहिमेच्या कालावधीपुरती मर्यादित राहू नये, तर ती लोकांच्या वर्तणुकीचा आणि दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनली पाहिजे, असे केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण तसेच ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज सांगितले. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय तसेच ग्रामविकास मंत्रालयाच्या सचिव आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित बैठकीला संबोधित करताना, त्यांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना स्वच्छता उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले आणि स्वतः पुढाकार घेऊन इतरांसमोर आदर्श ठेवण्याची विनंती केली. त्यांनी कार्यालये, कामाची ठिकाणे, क्षेत्रीय कार्यालये आणि ग्रामीण भागात स्वच्छतेबाबत जागरूकता व सहभाग सातत्याने बळकट करण्याच्या गरजेवरही भर दिला. स्वच्छतेला संस्था आणि समुदायांमध्ये एक कायमस्वरूपी सवय आणि सामायिक जबाबदारी बनवण्यासाठी केवळ एखाद्या निश्चित मोहिमेच्या कालावधीपुरते मर्यादित उपक्रम राबवण्याऐवजी शाश्वत प्रयत्नांची आवश्यकता आहे, असे चौहान यांनी नमूद केले.

  

स्वच्छता उपक्रम प्रभावी आणि शाश्वत दोन्ही व्हावे याची खातरजमा करण्यासाठी 'स्वच्छता ही सेवा 2026' मध्ये व्यापक लोकसहभागाची आवश्यकता आहे, असे चौहान म्हणाले. त्यांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आपल्या कार्यक्षेत्रात स्वच्छतेला प्राधान्य देण्याचे आणि अशा उपक्रमांना केवळ एक कार्यालयीन आवश्यकता मानण्याऐवजी स्वतःहून पुढाकार घेण्याचे निर्देश दिले. त्यांनी ग्रामीण भाग, पंचायती आणि क्षेत्रीय स्तरावरील कार्यालयांना स्वच्छता उपक्रमांशी प्रभावीपणे जोडण्यावर तसेच शेतकरी, ग्रामीण समुदाय, स्वच्छता कामगार, प्रसारमाध्यमे आणि इतर संबंधित भागधारकांचा सहभाग सुनिश्चित करण्यावर विशेष भर दिला.

स्वच्छता उपक्रम केवळ एक औपचारिकता बनून राहू नयेत, तर त्यातून स्पष्ट आणि मोजता येण्याजोगे परिणाम मिळाले पाहिजेत, असे निर्देश त्यांनी दिले. उपक्रमांचे परिणाम आणि प्रभावाचे योग्य प्रकारे मूल्यमापन करता येण्यासाठी मोहिमेचा एक भाग म्हणून हाती घेतलेल्या कामाच्या पद्धतशीर दस्तावेजीकरणाच्या गरजेवर त्यांनी भर दिला.

 

* * *

सुषमा काणे/निखिलेश चित्रे/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2317914) अभ्यागत कक्ष : 8