पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

आशियायी क्रीडा स्पर्धेत तिरंदाजीत पुरुषांच्या कंपाउंड वैयक्तिक प्रकारात कांस्यपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधानांनी केले गणेश मणी रत्नम थिरुमुरू याचे अभिनंदन

Posted On: 01 OCT 2026 7:20PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 1 ऑक्‍टोबर 2026

 

आशियायी क्रीडा स्पर्धेत तिरंदाजीत पुरुषांच्या कंपाउंड वैयक्तिक प्रकारात कांस्यपदकाच्या लढतीत अटीतटीच्या सामन्यात विजय मिळवल्याबद्दल गणेश मणी रत्नम थिरुमुरू याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.

दडपणाच्या परिस्थितीतही अचूक लक्ष्यभेद, उल्लेखनीय संयम आणि दृढ आत्मविश्वासाच्या जोरावर गणेशने देशाचा गौरव वाढवला आहे, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

त्याच्या आगामी वाटचालीसाठी पंतप्रधानांनी शुभेच्छा दिल्या.

पंतप्रधान कार्यालयाने ‘एक्स’वरील पोस्टमध्ये म्हटले आहे :

“आशियायी क्रीडा स्पर्धेतील पुरुषांच्या कंपाउंड वैयक्तिक कांस्यपदकाच्या लढतीत अटीतटीच्या सामन्यात विजय मिळवल्याबद्दल गणेश मणी रत्नम थिरुमुरू याचे अभिनंदन. दबावाच्या परिस्थितीतही अचूक लक्ष्यभेद, उल्लेखनीय संयम आणि अढळ जिद्दीच्या जोरावर गणेशने देशाचा गौरव वाढवला आहे. त्याच्या आगामी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा: PM @narendramodi"

 

* * *

शैलेश पाटील/वैभवी जोशी/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2317901) अभ्यागत कक्ष : 6