पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

जागतिक पर्यटन केंद्र म्हणून भारताची झालेली प्रगती अधोरेखित करणारा लेख पंतप्रधानांनी केला सामायिक

Posted On: 01 OCT 2026 5:57PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 1 ऑक्‍टोबर 2026

 

केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी लिहिलेला एक विशेष लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सामायिक केला.

उत्तम दळणवळण आणि संपर्क जोडणी, पर्यटनाच्या सुधारित सुविधा आणि डिजिटल सुविधांची सुलभ उपलब्धता या बळावर जागतिक पर्यटनाच्या नकाशावर भारताचा कशारितीने उदय झाला आहे ही बाब लेखातून अधोरेखित केली आहे. अशा तऱ्हेने झालेल्या विकासामुळे स्थानिक उद्योग व्यावसायिक, मार्गदर्शक (गाईड्स), कारागीर आणि स्थानिक समुदायांसाठी नवीन संधी निर्माण होत असल्याचे या लेखात नमूद केले आहे.

पर्यटनाच्या पुढील टप्प्यात शाश्वतता केंद्रस्थानी असणार आहे अशी मांडणी या लेखात केलेली आहे. पर्यटकांना अधिक चांगला अनुभव देण्यासोबतच भारताचा समृद्ध वारसा आर्थिक संधींशी जोडला जात असल्याचेही या लेखातून अधोरेखित केले  आहे.

यासंदर्भात पंतप्रधान कार्यालयाने X या समाजमाध्यमावर सामायिक केलेला संदेश:

"उत्तम दळणवळण आणि संपर्क जोडणी, पर्यटनाच्या सुधारित सुविधा आणि डिजिटल सुविधांची सुलभ उपलब्धता या बळावर जागतिक पर्यटनाच्या नकाशावर भारताचा कशा रितीने उदय झाला याबाबत केंद्रीय मंत्री @gssjodhpur यांनी लिहिले आहे. या  विकासामुळे स्थानिक उद्योग व्यावसायिक, मार्गदर्शक (गाईड्स), कारागीर आणि स्थानिक समुदायांसाठी नवीन संधी निर्माण होत आहेत.

पर्यटनाच्या पुढच्या टप्प्यात शाश्वतता केंद्रस्थानी असणार आहे, अशावेळी भारत आपल्या समृद्ध वारशाला आर्थिक संधींची जोड देत असून, पर्यटकांना अधिक समृद्ध अनुभवही प्रदान करत आहे."

 

* * *

सुषमा काणे/तुषार पवार/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2317809) अभ्यागत कक्ष : 7