पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी प्रत्येकाने आपले कर्तव्य निष्ठापूर्वक करण्याचे महत्त्व अधोरेखित करणारे संस्कृत सुभाषित केले सामायिक
Posted On:
30 SEP 2026 10:21AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक संस्कृत सुभाषित सामायिक केले असून जे आपल्या कर्तव्यपूर्तीसाठी निष्ठेने कार्य करतात त्यांनाच सर्वोच्च सिद्धी प्राप्त होते असे या सुभाषितात म्हटले आहे. जे आपले काम अत्यंत निश्चयाने आणि प्रामाणिकपणे करत असतात त्यांनी हे समजून घेतले पाहिजे की निष्ठापूर्वक केलेल्या कार्यामुळेच परिपूर्णतेची सर्वोच्च अवस्था गाठता येते, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
पंतप्रधानांनी एक संस्कृत सुभाषित सामायिक केले आहे:
“स्वे स्वे कर्मण्यभिरतः संसिद्धिं लभते नरः।
स्वकर्मनिरतः सिद्धिं यथा विन्दति तच्छृणु॥”
जे आपापल्या कर्तव्याप्रती निष्ठावान राहतात, तेच सर्वोच्च सिद्धी प्राप्त करतात. म्हणूनच, जे लोक आपली कर्तव्ये निष्ठेने पार पाडतात, त्यांनी समर्पित आणि प्रामाणिक कृतीद्वारे सिद्धीची सर्वोच्च अवस्था कशी प्राप्त करता येईल, हे समजून घेतले पाहिजे, असे या सुभाषितात म्हटले आहे.
***
नितीन फुल्लुके/भक्ती सोनटक्के/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2317125)
अभ्यागत कक्ष : 10
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam