पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या 4x400 मीटर रिले संघाला सुवर्णपदक, पंतप्रधानांकडून किरण पहल, पूवम्मा एम. आर., प्राची आणि विथ्या रामराज यांचे अभिनंदन

Posted On: 29 SEP 2026 9:33PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 29 सप्‍टेंबर 2026

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आशियाई क्रीडा स्पर्धेतील महिलांच्या 4×400 मीटर रिले स्पर्धेत सुरेख कामगिरी करणाऱ्या किरण पहल, पूवम्मा एम. आर., प्राची आणि विथ्या रामराज यांचे अभिनंदन केले आहे. या खेळाडूंच्या वेग आणि जिद्दीमुळे भारताने अव्वल स्थान पटकावले, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे. भारतीय ॲथलेटिक्ससाठी ही कामगिरी अभिमानाचा क्षण असल्याचेही पंतप्रधानांनी म्हटले आहे.

ही कामगिरी सांघिक प्रयत्नांमधून काय साध्य करता येते, याचे उत्तम उदाहरण आहे, असे मोदी यांनी म्हटले आहे. या खेळाडूंना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी पंतप्रधानांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

पंतप्रधान कार्यालयाने एक्सवरील एका संदेशात म्हटले आहे.

"आशियाई क्रीडा स्पर्धेतील महिलांच्या 4×400 मीटर रिले स्पर्धेत सुरेख कामगिरी केल्याबद्दल किरण पहल, पूवम्मा एम. आर., प्राची आणि विथ्या रामराज यांचे अभिनंदन. त्यांच्या वेग आणि जिद्दीच्या जोरावर भारताने अव्वल स्थान पटकावले आहे. भारतीय ॲथलेटिक्ससाठी हा अभिमानाचा क्षण आहे. सांघिक प्रयत्नांतून काय साध्य करता येते, याचे हे उत्तम उदाहरण आहे. या खेळाडूंना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. PM @narendramodi"

 

* * *

सुषमा काणे/राज दळेकर/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2316751) अभ्यागत कक्ष : 14