कौशल्य विकास आणि उद्यमशीलता मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

विशेष मोहिम 5.0 अंतर्गत मिळवलेल्या भक्कम यशाच्या पार्श्वभूमीवर कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय विशेष मोहिम 6 साठी सज्ज

Posted On: 29 SEP 2026 3:12PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 29 सप्‍टेंबर 2026

 

भारत सरकारने विशेष मोहिम 6 सुरू करण्याची घोषणा केली आहे. ही मोहिम 2 ते 31 ऑक्टोबर 2026 दरम्यान राबवली जाणार असून मोहीमेचा पूर्वतयारीचा टप्पा 15 ते 30 सप्टेंबर 2026 पार पडला. या मोहिमेत शासकीय कार्यालयांमध्ये स्वच्छतेचे संस्थात्मक पद्धतीने पालन, प्रलंबित प्रकरणांचा निपटारा, कार्यक्षम अभिलेख व्यवस्थापन, ई-कचरा व्यवस्थापन, जागेचा प्रभावी वापर आणि कामाच्या ठिकाणचा अनुभव सुधारण्यावर लक्ष केंद्रित केले जाईल.

कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाने (एमएसडीई) विशेष मोहिम 5.0 मध्ये सक्रियपणे सहभाग घेतला होता. मंत्रालयाच्या कार्यालयांमध्ये आणि संस्थांमध्ये स्वच्छता, अभिलेख व्यवस्थापन, जागेचा योग्य वापर आणि प्रलंबित प्रकरणांचा निपटारा यावर विशेष भर देण्यात आला होता. या मोहिमेत 1,836 हून अधिक स्वच्छता मोहिमा राबवण्यात आल्या. मंत्रालयाने संसद सदस्यांकडून प्राप्त झालेले 3 संदर्भ, 7 संसदीय आश्वासने, 307 सार्वजनिक तक्रारी आणि 27 सार्वजनिक तक्रार अपील निकाली काढले.

अभिलेख व्यवस्थापन उपक्रमांतर्गत, 1,250 फायलींचे पुनरावलोकन करण्यात आले आणि 466 फायलींची विल्हेवाट लावण्यात आली. याव्यतिरिक्त, 658 ई-फायलींचे पुनरावलोकन करण्यात आले, त्यापैकी 266 ई-फायली बंद करण्यात आल्या. या प्रयत्नांमुळे फायली काढून टाकल्याने आणि भंगाराची विल्हेवाट लावल्याने सुमारे 4,000 चौरस फूट कार्यालयीन जागा मोकळी झाली. तर भंगार विल्हेवाटीतून सुमारे 7.58 लाख रुपये महसूल देखील मिळाला.

एमएसडीई आणि त्याच्या संलग्न, स्वायत्त, अधीनस्थ आणि क्षेत्रीय कार्यालयांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे स्वच्छ आणि अधिक कार्यक्षम कार्यस्थळे निर्माण करण्यास, अभिलेख व्यवस्थापन सुधारण्यास आणि उपलब्ध कार्यालयीन जागेचा इष्टतम वापर करण्यास हातभार लागला. या मोहिमेमुळे स्वच्छ कार्यालयीन वातावरण राखण्याचे तसेच कचऱ्याची जबाबदारीने विल्हेवाट लावण्याचे महत्त्व याबद्दलची जागरूकता देखील वाढली.

विशेष मोहिम 6 च्या तयारीसाठी एमएसडीईने पूर्वतयारीचे उपक्रम सुरू केले असून, आपल्या संलग्न, अधीनस्थ तसेच स्वायत्त संस्था आणि क्षेत्रीय संस्थांमधील नोडल अधिकारी आणि हितधारकांशी समन्वय साधत आहे. मोहिमेच्या प्रमुख लक्ष्य क्षेत्रांविषयी नोडल अधिकाऱ्यांमध्ये जागरूकता निर्माण केली जात आहे. मोहिमेच्या प्रमुख लक्ष्य क्षेत्रांमध्ये स्वच्छता, प्रलंबित प्रकरणांची विल्हेवाट, कार्यक्षम अभिलेख व्यवस्थापन, लागू असलेल्या ई-कचरा व्यवस्थापन नियम, 2022 नुसार ई-कचरा व्यवस्थापन, जागेचे व्यवस्थापन आणि कामाच्या ठिकाणचा अनुभव सुधारणे यांचा समावेश आहे.

विशेष मोहीम 5.0 दरम्यान निर्माण झालेली गती पुढे कायम राखण्यासाठी तसेच शाश्वत स्वच्छता पद्धती, प्रलंबित प्रकरणांची प्रभावी विल्हेवाट, जबाबदार ई-कचरा व्यवस्थापन, सुधारित अभिलेख व्यवस्थापन तसेच अधिक स्वच्छ, अधिक कार्यक्षम आणि उत्तम प्रकारे वापरल्या जाणाऱ्या कामाच्या जागांच्या निर्मितीद्वारे विशेष मोहीम 6 च्या उद्दिष्टांमध्ये महत्त्वपूर्ण योगदान देण्यासाठी मंत्रालय कटिबद्ध आहे.

 

* * *

नितीन फुल्लुके/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2316475) अभ्यागत कक्ष : 13