पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या 1500 मीटर धावण्याच्या शर्यतीत रौप्यपदक जिंकल्याबद्दल गुलवीर सिंगचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन

Posted On: 28 SEP 2026 10:23PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 28 सप्‍टेंबर 2026

 

आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या 1500 मीटर धावण्याच्या शर्यतीत रौप्य पदक जिंकल्याबद्दल गुलवीर सिंगचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.

त्यांची ही वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी असल्याने ती आणखी खास ठरली आहे असे नमूद करत भारताला त्यांचा अभिमान असल्याचे मोदी म्हणाले.

‘एक्स’ या समाजमाध्यमावरील संदेशांत पंतप्रधानांनी म्हटले आहे :

“आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या 1500 मीटर शर्यतीत रौप्यपदक जिंकल्याबद्दल गुलवीर सिंग यांचे अभिनंदन! त्यांनी आपली वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी नोंदवली असल्या कारणाने ही कामगिरी अधिक विशेष ठरते. भारताला त्यांचा अभिमान आहे: PM @narendramodi"

 

* * *

निलिमा चितळे/सविता म्‍हस्‍कर/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2316314) अभ्यागत कक्ष : 8