पंतप्रधान कार्यालय
आशियाई क्रीडा स्पर्धेत भालाफेकीत रौप्य आणि कांस्य पदक जिंकल्याबद्दल यशवीर सिंग आणि रोहित यादव यांचे पंतप्रधानांकडून अभिनंदन
Posted On:
28 SEP 2026 9:52PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 सप्टेंबर 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आशियाई क्रीडा स्पर्धेत वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरीसह रौप्य पदक जिंकल्याबद्दल यशवीर सिंगचे तर कांस्य पदक मिळवल्याबद्दल रोहित यादवचे अभिनंदन केले. आशियाई क्रीडा स्पर्धेच्या पोडीयमवर आलेल्या दोन्ही भारतीय भालाफेकपटूंच्या कामगिरीचे पंतप्रधानांनी कौतुक केले.
दोन्ही खेळाडूंसाठी तसेच भारतीय ॲथलेटिक्ससाठी हे उत्कृष्ट यश असल्याचे पंतप्रधान म्हणाले. पंतप्रधानांनी या क्रीडापटूंना त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
पंतप्रधान कार्यालयाने X या समाज माध्यमावरील संदेशात म्हटले आहे :
"आशियाई क्रीडा स्पर्धेच्या पोडीयमवर दोन भारतीय भालाफेकपटू!
वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरीसह रौप्यपदक जिंकल्याबद्दल यशवीर सिंगचे आणि कांस्यपदक पटकावल्याबद्दल रोहित यादवचे अभिनंदन.
दोन्ही खेळाडूंसाठी आणि भारतीय ॲथलेटिक्ससाठी हे उत्कृष्ट यश आहे. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा: PM @narendramodi"
* * *
निलिमा चितळे/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2316284)
अभ्यागत कक्ष : 7