सांस्कृतिक मंत्रालय
पंतप्रधान स्मृतीचिन्ह ई लिलाव 2026 मध्ये राजस्थानची कला, श्रद्धा, राजेशाही आणि क्रीडा वारशाचे दर्शन
Posted On:
27 SEP 2026 4:05PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 सप्टेंबर 2026
राजस्थानची समृद्ध कला, भक्ती, हस्तकौशल्य आणि परंपरेचे वैविध्य पंतप्रधान स्मृतीचिन्ह ई लिलाव 2026 मध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या विविध स्मृतिचिन्हांमधून अनुभवायला मिळत आहे. या संग्रहात राज्यातील लोकदेवता, पारंपरिक चित्रकला, वस्त्रपरंपरा, स्थापत्य वारसा आणि क्रीडा क्षेत्रातील कामगिरीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या 37 कलाकृतींचा समावेश आहे.

या संग्रहातील उल्लेखनीय कलाकृतींपैकी एक म्हणजे लाकडापासून हस्तकलेने तयार केलेला आणि पारंपरिक नक्षीकामाने सजवलेला अंबाबारी हत्ती. याशिवाय, राजेशाही अंबारीसोबत समारंभासाठीचे सेवक दाखवणारा लाकडी हस्तकलेचा हत्तींच्या मिरवणुकीचा संचही या संग्रहात आहे.
या संग्रहात वीर तेजाजी महाराजांचे चांदीचे स्मृतिचिन्ह असून त्यात पूजनीय लोकदेवता तेजाजी महाराजांना घोड्यावर आरूढ दाखवण्यात आले आहे. आणखी एका चांदीचा मुलामा दिलेल्या मूर्तीमध्ये तेजाजी महाराजांना त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण भाला आणि नागाच्या प्रतिकासह घोड्यावर स्वार झालेले दाखवण्यात आले आहे.

या संग्रहात नाथद्वारातील श्रीनाथजींची पिछवाई चित्रे, लक्ष्मी आणि नारायण यांचे चित्रण करणारे फड चित्र तसेच कृष्ण रासलीलेचे चित्रण करणारी पट्टचित्र शैलीतील कलाकृती यांचा समावेश आहे. या कलाकृती संग्रहातील भक्तिपर कथाकथनाच्या विविध शैली आणि कलात्मक अभिव्यक्तीचे दर्शन घडवतात.
या सांस्कृतिक आणि क्रीडाविषयक कलाकृतींसोबतच ऐतिहासिक आणि समकालीन स्मृतिचिन्हांचाही समावेश आहे. यामध्ये अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठेशी संबंधित फ्रेम केलेल्या वृत्तपत्रांच्या आवृत्त्या आणि राजस्थान भाजपकडून जारी करण्यात आलेल्या सजावटीच्या ताटावरील कलाकृतीचा समावेश आहे.एकूण 37 स्मृतिचिन्हांमधून राजस्थानच्या लोकपरंपरा, भक्तीपर कला, चित्रकला, वस्त्रपरंपरा, ऐतिहासिक वारसा, स्थापत्य आणि समकालीन कामगिरीचे विविध पैलू समोर येतात. पंतप्रधान स्मृतीचिन्ह ई लिलाव 2026 मध्ये राजस्थानच्या सांस्कृतिक अस्मितेचे हे विविध पैलू एकत्रितपणे सादर करण्यात आले आहेत.


पंतप्रधान स्मृतीचिन्ह ई लिलाव 2026ची 8वी आवृत्ती 2 ऑक्टोबर 2026 पर्यंत सुरू असून, त्यात राजस्थानच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे आणि परंपरांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या विविध स्मृतिचिन्हांचा समावेश आहे. लिलावाच्या तारखा, सहभागाची माहिती आणि संपूर्ण सूचीसाठी अधिकृत पंतप्रधान स्मृतीचिन्ह ई लिलाव पोर्टलला भेट देता येईल: pmmementos.gov.in

* * *
सुषमा काणे/नितीन गायकवाड/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2315554)
अभ्यागत कक्ष : 8