पंतप्रधान कार्यालय
आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या गोळाफेक प्रकारात रौप्यपदक जिंकल्याबद्दल तजिंदरपाल सिंह यांचे पंतप्रधानांकडून अभिनंदन
Posted On:
26 SEP 2026 8:50PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 26 सप्टेंबर 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या गोळाफेक (शॉट पुट) प्रकारात प्रभावी फेकीसह रौप्यपदक पटकावल्याबद्दल तजिंदरपाल सिंग यांचे अभिनंदन केले.
तजिंदरपाल यांनी आपल्या एकाग्रता आणि जिद्दीच्या बळावर देशासाठी सातत्याने यश मिळवून दिल्याचे, पंतप्रधानांनी नमूद केले. आशियाई क्रीडा स्पर्धेतील हे पदक त्यांच्या उल्लेखनीय प्रवासात आणखी एक मनाचा तुरा असल्याचे सांगून, मोदी यांनी त्यांना भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
X वरील पोस्टमध्ये पंतप्रधान कार्यालयाने म्हटले आहे,
"@Tajinder_Singh3 यांची अत्यंत शानदार कामगिरी! आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या गोळाफेक प्रकारात प्रभावी फेकीसह रौप्यपदक जिंकल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!
तजिंदरपाल यांनी आपल्या एकाग्रता आणि जिद्दीच्या बळावर देशासाठी सातत्याने यश मिळवून दिले आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेतील हे पदक त्यांच्या उल्लेखनीय प्रवासात आणखी एक मनाचा तुरा आहे. त्यांना भविष्यातील वाटचालीत असेच उदंड यश मिळत राहो, याच शुभेच्छा : PM @narendramodi”
* * *
माधुरी पांगे/वैभवी जोशी/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2315420)
अभ्यागत कक्ष : 9