पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांनी केले सुवर्णपदक विजेत्या महिला कबड्डी संघाचे अभिनंदन

Posted On: 26 SEP 2026 8:40PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 26 सप्‍टेंबर 2026

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रोमहर्षक सामन्यात सुवर्णपदक जिंकणाऱ्या महिलांच्या कबड्डी संघाचे अभिनंदन केले आहे.

या संघाने अद्वितीय धैर्य, संयम व संघभावनेचे दर्शन घडविले आहे, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे. आपल्या कबड्डीतील अजिंक्यवीरांचा भारताला अभिमान वाटतो असे नमूद करुन पंतप्रधानांनी खेळाडूंना हे यश असेच वाढत राहो, अशा सदिच्छा दिल्या आहेत.

पंतप्रधान कार्यालयाच्या ‘एक्स’ समाजामाध्यमावरील संदेशात म्हटले आहे,

“अत्यंत रोमांचकारी अंतिम सामना आणि महिला कबड्डी संघाचे झळाळते सुवर्ण यश!

सर्व खेळाडूंचे अभिनंदन. या संघाने अतुलनीय धैर्य, संयम व सांघिक भावनेचे दर्शन घडविले आहे. भारताला आपल्या कबड्डी अजिंक्यवीरांचा अभिमान आहे. भविष्यात आणखी यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा!

PM @narendramodi”

 

* * *

माधुरी पांगे/सुरेखा जोशी/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2315411) अभ्यागत कक्ष : 7