पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

आशियाई क्रीडा स्पर्धेत गोळाफेकमध्ये कांस्यपदक जिंकणाऱ्या मनप्रीत कौरचे पंतप्रधानांकडून अभिनंदन

Posted On: 25 SEP 2026 9:17PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आशियाई क्रीडा स्पर्धेत गोळाफेक प्रकारात कांस्य पदक जिंकल्याबद्दल मनप्रीत कौरचे अभिनंदन केले.

गोळाफेकीमध्‍ये मनप्रीतच्या  या उल्लेखनीय कामगिरीचे कौतुक करून  पंतप्रधानांनी तिला भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

पंतप्रधान कार्यालयाने 'एक्स' या समाज माध्‍यमावर पोस्ट केले:

"गोळाफेक प्रकारात मनप्रीत कौरने उत्तम कामगिरी केली आहे! तिच्या उत्तम गोळाफेकीमुळे आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला कांस्य पदक मिळाले आहे. मनप्रीतचे मनापासून अभिनंदन! तिला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा: पंतप्रधान @narendramodi"

***

सुवर्णा बेडेकर/वैभवी जोशी/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2315197) अभ्यागत कक्ष : 9