आयुष मंत्रालय
अकराव्या आयुर्वेद दिनानिमित्त आयटीआरए जामनगरतर्फे जन-जागृती,आरोग्यसेवा आणि वैज्ञानिक उपक्रमांचे आयोजन
आरोग्य,पोषण आणि जनजागृती उपक्रमांद्वारे 2,500 हून अधिक लाभार्थ्यांपर्यंत संपर्क
Posted On:
23 SEP 2026 7:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली,23 सप्टेंबर 2026
जामनगर येथील आयटीआरए म्हणजेच ‘इन्स्टिट्यूट ऑफ टीचिंग अँड रिसर्च इन आयुर्वेद’ मध्ये 11 व्या आयुर्वेद दिनानिमित्त जन-जागृती, आरोग्यसेवा, संशोधन आणि वैज्ञानिक उपक्रमांची महिनाभर चालणारी मालिका आयोजित केली आहे. यामध्ये आयुर्वेद, निरोगी जीवनशैली, पोषण, प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा आणि वैज्ञानिक संशोधन यांवर विशेष भर देण्यात आला आहे.
हे उपक्रम आयुष मंत्रालयाचे केंद्रीय राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार प्रतापराव जाधव आणि आयुष मंत्रालयाचे सचिव वैद्य राजेश कोटेचा यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आयटीआरए च्या संचालिका प्रा. डॉ. तनुजा नेसरी यांच्या प्रयत्नांतून आयोजित केले जात आहेत.
या उपक्रमांमध्ये आरोग्य तपासणी शिबिरे, पोषणविषयक जनजागृती कार्यक्रम, वैद्यकीय शिबिरे, ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्यसेवा, शाळा आणि अंगणवाडी कार्यक्रम, औषधी वनस्पतींची लागवड, वैज्ञानिक प्रशिक्षण, संशोधन सादरीकरणे आणि कार्यशाळा यांचा समावेश आहे. या उपक्रमांचा विस्तार शाळा, अंगणवाड्या, वृद्धाश्रम, मुलींची वसतिगृहे, शैक्षणिक संस्था, सशस्त्र संरक्षण दलांची केंद्रे आणि औद्योगिक क्षेत्रांपर्यंत करण्यात आला आहे.
आतापर्यंत किमान 2,577 लाभार्थ्यांनी या उपक्रमांमध्ये थेट सहभाग घेतला आहे. 7 ते 22 सप्टेंबर दरम्यान लष्कर, हवाई दल, नौदल आणि सीआयएसएफ ची केंद्रे, शैक्षणिक आणि महिला संस्था आणि औद्योगिक आस्थापनांमध्ये राबवलेले आरोग्य जनजागृती कार्यक्रम, तसेच 11 सार्वजनिक ठिकाणी सादर केलेली आयुर्वेद आहाराविषयीची पथनाट्ये, यामुळे या उपक्रमांची व्याप्ती अधिक वाढली आहे.
‘आयटीआरए’ ने वैज्ञानिक आणि शैक्षणिक उपक्रमही आयोजित केले आहेत, यामध्ये संशोधन सादरीकरणे, प्रयोगशाळेतील गुणवत्ता-नियंत्रण प्रशिक्षण, क्यूएक्सेल कनेक्ट चे प्रात्यक्षिक तसेच प्रशिक्षण, मायक्रोबायोम कार्यशाळा आणि कायाप्रबोधिनी वेबिनार यांचा समावेश आहे.
तरुणांवर केंद्रित असलेल्या उपक्रमांमध्ये ‘’प्राचीन मुख्य अन्न, आधुनिक भोजन थाळी’’ या विषयावर रील स्पर्धा, युवा संसद, विद्यार्थी राजदूत कार्यक्रम, राष्ट्रीय निबंध आणि ई-पोस्टर स्पर्धा, रन फॉर आयुर्वेद , मास्टर शेफ पाककला स्पर्धा आणि आयुर्वेदातील नवीन माध्यमे आणि डिजिटल संवादावरील परिसंवाद यांचा समावेश आहे.
आयटीआरए च्या संचालिका प्रा. डॉ. तनुजा नेसरी यांनी सांगितले की, आयुर्वेद दिन मोहीम, आरोग्य, पोषण, संशोधन, शिक्षण, पर्यावरण आणि तरुणांचा सहभाग यांना एकत्र आणत आहे आणि त्याच वेळी आरोग्यासाठी एक समग्र व प्रतिबंधात्मक दृष्टिकोन म्हणून आयुर्वेदाचा प्रसार करत आहे.



सुवर्णा बेडेकर/राजेश शिरभाते/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2314139)
अभ्यागत कक्ष : 11