संरक्षण मंत्रालय
भारतीय हवाई दल आणि जपान यांच्या संयुक्त हवाई संरक्षण सराव -'एक्सरसाइज वीर गार्डियन 2026' ची सांगता
Posted On:
22 SEP 2026 4:39PM by PIB Mumbai
नवी दिल्ली,22 सप्टेंबर 2026
भारतीय हवाई दल आणि जपानच्या एअर सेल्फ-डिफेन्स फोर्स (JASDF) यांच्यातील 'वीर गार्डियन 2026' हा द्विपक्षीय हवाई सराव 22 सप्टेंबर 2026 रोजी जोधपुरमध्ये संपन्न झाला. उभय देशांच्या हवाई दलांमधील आंतरकार्यक्षमता आणि धोरणात्मक भागीदारी अधिक दृढ करण्यासाठी हा हवाई सराव खूपच उपयुक्त ठरला. भारतीय हवाई दलाच्या विविध प्रकारच्या विमानांनी या हवाई सरावात सहभाग घेतला. यात, Su-30 MKI, राफेल, तसेच स्वदेशी बनावटीच्या 'लाइट कॉम्बॅट एअरक्राफ्ट' (LCA) ‘तेजस’ यांसारख्या विविध प्रकारच्या विमानांचा समावेश होता, तर जपानच्या हवाई दलाने (JASDF) F-2A या लढाऊ विमानांसह यात सहभाग घेतला.
14 दिवसांच्या संयुक्त हवाई सरावा दरम्यान, IAF आणि JASDF यांनी थेट नजरेस पडणाऱ्या अंतरावरील हवाई युद्ध (visual range combat) आणि अनेक विमानांच्या एकत्रित आणि सुनियोजित मोहिमा यांसारख्या विविध आधुनिक उड्डाण मोहिमांमध्ये सहभाग घेतला. विशेष अतिथि दिनाच्या दिवशी जपानच्या हवाई दलाचे प्रमुख जनरल ताकेहिरो मोरिता आणि भारतीय हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल ए. पी. सिंग यांनी जोधपूर हवाई दल तळाला भेट देऊन स्वदेशी बनावटीच्या ‘तेजस’ या लढाऊ विमानातून उड्डाण केले.
या सरावादरम्यान भारतीय हवाई दल आणि जपान हवाई संरक्षण दलाच्या (JASDF) अधिकाऱ्यांमध्ये विविध विषयांवर चर्चा झाली. यात, विशिष्ट क्षेत्रातील तज्ज्ञांचे आदान-प्रदान, कार्यपद्धतीवरील चर्चा, मोहिमांचे नियोजन करण्यासंदर्भात परिषदा, अभियांत्रिकी विषयातील परस्परसंवाद, देखभाल सराव आणि एरोस्पेस सुरक्षा माहिती सत्रांचा समावेश होता,ज्यामध्ये उभयपक्षी विविध पैलूंवर चर्चा करण्यात आली. यामुळे सहभागी तुकड्यांना एकमेकांच्या सर्वोत्तम कार्यपद्धतींबद्दल महत्वाची माहिती मिळवणे आणि एकमेकांच्या अद्वितीय क्षमतांमधून शिकणे शक्य झाले.
‘वीर गार्डियन 26’ हा हवाई सराव हा दोन्ही हवाई दलांमधील शाश्वत मैत्री आणि परस्पर सहकार्य आणि आपलेपणाचे द्योतक ठरला आहे. या उपक्रमामुळे भारत आणि जपान यांच्यातील संरक्षण भागीदारी अधिक दृढ करण्यासाठी आणि त्यातील धोरणात्मक व्याप्ती वाढवण्यासाठीचा मार्ग मोकळा झाला आहे.
_20260922150015_a6a376.jpeg)
_20260922150031_1a3775.jpeg)
_20260922150046_6bb160.jpeg)
_20260922150058_1193fa.jpeg)
_20260922150726_edf64a.jpeg)
_20260922150739_4b1d89.jpeg)
_20260922150751_81ae2b.jpeg)
_20260922150802_21afe7.jpeg)
सुषमा काणे/सविता म्हसकर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2313516)
अभ्यागत कक्ष : 8