पंतप्रधान कार्यालय
हवामान-अनुकूल जलव्यवस्थापन उभारण्याच्या आणि जलसुरक्षा सुनिश्चित करण्याचे प्रयत्न अधोरेखित करणारा केंद्रीय मंत्री सी.आर.पाटील यांचा लेख पंतप्रधानांनी सामायिक केला
Posted On:
22 SEP 2026 4:26PM by PIB Mumbai
नवी दिल्ली,22 सप्टेंबर 2026
केंद्रीय मंत्री सी. आर. पाटील यांनी लिहिलेला एक लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामायिक केला. जल सुरक्षा ही एक सामायिक जबाबदारी आहे असं नमूद करत पंतप्रधान म्हणाले की यासाठी सक्षम यंत्रणा, वैज्ञानिक उपाययोजना आणि लोकसहभाग आवश्यक आहे.
ते पुढे म्हणाले की केंद्रीय मंत्री सी. आर. पाटील यांनी ‘जल जीवन अभियान’, ‘नमामी गंगे’, जलसंधारण आणि तंत्रज्ञानावर आधारित उपाययोजनांच्या माध्यमातून हवामानाला अनुकूल जलव्यवस्थापन उभारण्याच्या भारताच्या प्रयत्नांवर आपले सखोल विचार मांडले आहेत. त्याचबरोबर, विविध राज्ये आणि समाजाच्या माध्यमातून पुढील पिढ्यांसाठी आपण पाण्याची सुरक्षा आणि व्यवस्थापन कसे करू शकतो यावरील त्यांचा अभ्यासपूर्ण दृष्टिकोण मांडला आहे.
‘एक्स’ या समाजमध्यमांवरील संदेशांत पंतप्रधान म्हणतात :
“जलसुरक्षा ही एक सामायिक जबाबदारी आहे, ज्यासाठी अधिक सक्षम यंत्रणा, वैज्ञानिक उपाययोजना आणि 'लोकसहभागा’ची आवश्यकता आहे.
केंद्रीय मंत्री @CRPaatil यांनी ‘जल जीवन अभियान, नमामि गंगे, जलसंधारण आणि तंत्रज्ञान-आधारित उपायांद्वारे हवामानाला अनुकूल असे जल व्यवस्थापन तयार करण्याच्या भारताच्या प्रयत्नांवर लिहिले आहे.
लोकसहभाग तसेच विविध राज्ये आणि समुदायांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांच्या जोडीने, भविष्यातील पिढ्यांसाठी शाश्वत पद्धतीने पाणी कसे सुनिश्चित करता येईल, यावर त्यांनी अभ्यासपूर्ण दृष्टिकोन मांडला आहे.”
सुषमा काणे/सविता म्हसकर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2313489)
अभ्यागत कक्ष : 10