संरक्षण मंत्रालय
आसियान देशांच्या संरक्षण मंत्र्यांची बैठक (MDMM) आणि ‘प्लस’ संयुक्त सहकार्य कृतीसाठी (JCA) भारतीय नौदलाच्या सह्याद्री आणि कुलिश जहाजांचे फिलिपिन्समधील सुबिक बे इथे आगमन
Posted On:
21 SEP 2026 5:02PM by PIB Mumbai
नवी दिल्ली,21 सप्टेंबर 2026
भारतीय नौदलाची जहाजे सह्याद्री आणि कुलिश 20 सप्टेंबर 2026 रोजी फिलिपिन्समधील सुबिक बे येथे आसियान संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीतील (एडीएमएम)-प्लस संयुक्त सहकार्य उपक्रमात (जेसीए) सहभागी होण्यासाठी दाखल झाली.
एडीएमएम-प्लस संयुक्त सहकार्य उपक्रमामध्ये (जेसीए) आसियान सदस्य देशांच्या तसेच आठ ‘प्लस’ देशांच्या सागरी दलांचा सहभाग असतो. या उपक्रमांतर्गत सागरी क्षेत्रातील आंतरकार्यशीलता वाढवणे, परस्पर समज वाढीस लावणे आणि सहकार्य अधिक बळकट करणे या उद्देशाने व्यावसायिक आणि कार्यान्वयनात्मक स्वरूपाच्या विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते.
एडीएमएम-प्लस जेसीए मध्ये भारतीय नौदलाच्या जहाजांचा सहभाग भारत सरकारच्या ऍक्ट ईस्ट धोरणाशी आणि महासागर (MAHASAGAR) अर्थात ‘प्रदेशांमधील सुरक्षा आणि वाढीसाठी परस्पर आणि सर्वसमावेशक प्रगती’ या दृष्टीकोनाशी सुसंगत आहे. यातून, बहुपक्षीय सागरी सहकार्य आणि प्रादेशिक भागीदारांसह रचनात्मक गुंतवणूकीसाठी भारताची वचनबद्धता अधोरेखित होते. या उपक्रमामुळे भारतीय नौदलाला व्यावसायिक आणि कार्यात्मक स्तरावर संवाद साधण्याची संधी मिळेल, ज्यामुळे सामायिक सागरी आव्हाने समजून घेण्यात मदत होईल.
या भेटीतून भारत आणि फिलिपिन्स यांच्यातील वाढत्या सागरी संबंधांचे प्रतिबिंबित होते. अलीकडील द्विपक्षीय संबंध आणि ऑगस्ट 2025 मध्ये स्थापित झालेल्या भारत-फिलीपिन्स धोरणात्मक भागीदारीच्या आधारावर, अशा उपक्रमांमुळे उभय देशांमधील व्यावसायिक संबंध आणि सागरी सहकार्य अधिक दृढ करण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
(4)_20260921113810_c26140.jpeg)
(4)_20260921113820_aefaf1.jpeg)
(4)_20260921113831_4ad6de.jpeg)
नेहा कुलकर्णी/सविता म्हसकर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2313060)
अभ्यागत कक्ष : 9