पोलाद मंत्रालय
पोलाद आयातीसंदर्भात, पोलाद मंत्रालय 24 सप्टेंबर रोजी ओपन हाऊसचे आयोजन करणार
Posted On:
18 SEP 2026 11:36AM by PIB Mumbai
पोलाद मंत्रालय 24 सप्टेंबर 2026 रोजी नवी दिल्लीतील नेताजी नगर, जीपीओए-3, तिसरा मजला, स्टील रूम येथे पोलाद आयातीशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी ओपन हाऊसचे आयोजन करणार आहे. कंपन्या आणि संघटना या ओपन हाऊसमध्ये उपरोक्त विषयांशी संबंधित आपले मुद्दे मांडू शकतात. ओपन हाऊसमध्ये सहभागी होण्यासाठी, उपरोक्त तारखेला निश्चित वेळ मिळवण्याकरिता tech-steel[at]nic[dot]in यावर ई-मेल पाठवावा.
ई-मेल पाठवताना, खालील माहितीचा समावेश केला जाऊ शकतो:
१. कंपनी/संस्थेचे नाव
२. उद्योग आणि उत्पादनाचा प्रकार – ऑटो/एरोस्पेस/टेलिकॉम/संरक्षण, इत्यादी.
३. समस्या एसआयएमएस/एसएआरएएल एसआयएमएस /क्यूसीओ सवलतीशी संबंधित आहे
४. एसआयएमएस/एसएआरएएल एसआयएमएस/क्यूसीओ सवलतीच्या अर्जाचा संदर्भ (असल्यास)
५. समस्या थोडक्यात (कमाल 50 शब्द)
६. सहभागीचे नाव आणि पदनाम (तिसऱ्या व्यक्तीच्या प्रतिनिधीला परवानगी नाही)
७. सहभागीचा संपर्क तपशील (मोबाइल नंबर आणि ई-मेल)
ओपन हाऊस सकाळी 11.00 ते सायंकाळी 5.00 या वेळेत आयोजित केले जाईल आणि विशिष्ट वेळ ई-मेलद्वारे कळवली जाईल. लॉजिस्टिक्समधील आव्हानांमुळे थेट उपस्थिती शक्य होणार नाही आणि व्यापक सहभाग सुनिश्चित करण्यासाठी प्रत्येक संस्थेमधून फक्त एका प्रतिनिधीला परवानगी आहे.
पोलादाच्या आयातीसाठी SIMS/SARAL SIMS/QCO सवलतीशी संबंधित समस्या असलेल्या कोणत्याही कंपनीने किंवा संघटनेने, निश्चित वेळ मिळवण्यासाठी आपली विनंती 21 सप्टेंबर 2026, दुपारी 2.00 वाजेपर्यंत वरील ई-मेलवर पाठवावी, असा सल्ला देण्यात येत आहे.
***
नितीन फुल्लुके / राजेश शिरभाते /परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2311959)
अभ्यागत कक्ष : 4