सांस्कृतिक मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक मंत्रालयाकडून पुराना किला येथे 'आशीर्वाद का दिया' कार्यक्रमाचे आयोजन


पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली देशातील जनतेचा विश्वास दृढ झाला असून लोकसहभागातून विकासाच्या वाटेवर पुढे जाण्याचा प्रयत्न होत आहे: गजेंद्र सिंह शेखावत

Posted On: 18 SEP 2026 10:29AM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त, संस्कृती मंत्रालयाने 17 सप्टेंबर 2026 रोजी नवी दिल्लीत पुराना किला येथे 'आशीर्वाद का दीया' कार्यक्रमाचे आयोजन केले होते. केंद्रीय संस्कृती आणि पर्यटन मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी सेवा संकल्प अभियानांतर्गत "भारत माता की जय" च्या जयघोषात ‘आशीर्वाद का दीया’ प्रज्वलित करून कार्यक्रमाचे उद्घाटन केले.

आपल्या भाषणात केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत म्हणाले की, 'आशीर्वाद का दिया' हा केवळ एक दिवा नसून तो लोकांचे आशीर्वाद, सेवाभाव, कृतज्ञता आणि 'विकसित भारत' घडवण्याच्या संकल्पाच्या सामर्थ्याचे प्रतीक आहे. ते म्हणाले की, भारतीय संस्कृतीत दिवा हा स्वतः जळून इतरांच्या आयुष्यात प्रकाश पसरवण्याचा, अंधकार दूर करण्याचा आणि लोककल्याणाचा मार्ग प्रशस्त करण्याचा संदेश देतो. याच भावनेतून, हा दिवा राष्ट्रसेवेच्या सामूहिक संकल्पाचेही प्रतीक आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना केंद्रीय मंत्री म्हणाले की, त्यांचे सार्वजनिक जीवन राष्ट्रहित आणि जनसेवेसाठी समर्पित राहिले आहे. ते म्हणाले की, बालपणापासून ते आजपर्यंत ज्या ज्या भूमिकेत काम करण्याची संधी त्यांना मिळाली, त्या प्रत्येक भूमिकेत त्यांनी देशाला सर्वोच्च मानून पूर्ण निष्ठा आणि सेवाभावनेने काम केले. गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारण्यापासून ते पंतप्रधान म्हणून देशाचे नेतृत्व करण्यापर्यंत, राष्ट्रसेवा, लोककल्याण आणि विकासाप्रति त्यांची वचनबद्धता कायम आहे, असेही ते म्हणाले.

पंतप्रधानांबरोबर काम करण्याचा आपला अनुभव सांगताना शेखावत म्हणाले की, पंतप्रधानांबरोबर काम करण्याची संधी मिळणे हा त्यांच्या सार्वजनिक जीवनातील एक सन्माननीय अनुभव ठरला आहे. ते म्हणाले की, त्यांनी नरेंद्र मोदी यांना केवळ पंतप्रधान म्हणून नाही, तर एक समर्पित कार्यकर्ता, साधक, तपस्वी आणि संघटक म्हणून पाहिले आहे. ते म्हणाले की, पंतप्रधान आपले आचरण, कार्यशैली आणि मार्गदर्शनाने प्रत्येक स्तरावरील लोकांना प्रेरणा देतात आणि सार्वजनिक पदाला प्रतिष्ठा म्हणून नव्हे तर जबाबदारी आणि सेवेचे माध्यम मानतात.

केंद्रीय मंत्री म्हणाले की, पंतप्रधानांची कार्यशैली परिणामाभिमुख प्रशासनावर आधारित आहे. योजनांचे पुनरावलोकन केवळ प्रक्रिया किंवा आकडेवारीच्या आधारे होत नाही तर त्यांचा समाजावर प्रत्यक्ष परिणाम आणि समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचणारा बदल यांच्या आधारे घेतला जातो, असे ते म्हणाले. केंद्रीय मंत्री पुढे म्हणाले की, पंतप्रधानांचा स्पष्ट दृष्टीकोन असा आहे की केवळ फाईल पुढे नेणे म्हणजे काम पूर्ण करणे नाही, तर त्यातून निर्माण होणारे लोक-कल्याणाचे परिणाम हा सुशासनाचा खरा मापदंड आहे.

शेखावत म्हणाले की, 2014 नंतर भारताने विकास आणि सुशासनाचा एक नवीन प्रवास अनुभवला आहे. ते म्हणाले की, पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली देशाचा जनतेचा विश्वास दृढ झाला आहे आणि लोकसहभागाने विकासाला गती देण्याचे प्रयत्न केले जात आहेत. ते असेही म्हणाले की, "वारसा आणि विकास" एकमेकांच्या विरोधात नसून, एकमेकांना पूरक आहेत आणि विकसित भारताच्या उभारणीत दोघांचीही समान भूमिका आहे, अशी पंतप्रधानांची धारणा आहे.

या संदर्भात केंद्रीय मंत्री म्हणाले की, सांस्कृतिक मंत्रालय पंतप्रधानांच्या मार्गदर्शनाखाली "विकास भी, विरासत भी" या संकल्पासह काम करत आहे. ते म्हणाले की, भारताच्या शास्त्रीय, लोक आणि पारंपरिक सांस्कृतिक परंपरा आपल्या नागरी जाणिवेचा अमूल्य वारसा आहेत आणि त्यांचे जतन, संवर्धन आणि नवीन पिढीपर्यंत त्यांचा प्रसार करण्याला मंत्रालयाचे प्राधान्य आहे. ते असेही म्हणाले की, केवळ आपल्या वारशाने प्रेरित झालेला समाजच विकसित भारताच्या ध्येयाच्या दिशेने आत्मविश्वासाने आणि अभिमानाने पुढे जाऊ शकतो.

आपल्या भाषणात शेखावत यांनी नुकत्याच पार पडलेल्या 'ब्रिक्स' (BRICS) शिखर परिषदेचा उल्लेख केला. ते म्हणाले की, जागतिक स्तरावर भारताची भूमिका आणि भारतावर जगाचा वाढता विश्वास हे देशाचे निर्णायक नेतृत्व आणि राष्ट्रीय हिताप्रति भारताची वचनबद्धता दर्शवतात. ते म्हणाले की, कठीण परिस्थिती आणि आव्हाने असतानाही, भारताने राष्ट्रहिताला सर्वोच्च प्राधान्य देत जागतिक समुदायासमोर आपली प्रभावी भूमिका प्रस्थापित केली आहे.

या कार्यक्रमात संगीत नाटक अकादमी, कथक केंद्र, नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा, ललित कला अकादमी आणि क्षेत्रीय सांस्कृतिक केंद्रांमधील कलाकार आणि विद्यार्थ्यांनी भारतीय शास्त्रीय आणि सांस्कृतिक परंपरांवर आधारित सादरीकरणे केली. कार्यक्रमानंतर, केंद्रीय मंत्र्यांनी कलाकार, विद्यार्थी, तसेच 'नॅशनल कल्चर फंड', 'अडॉप्ट अ हेरिटेज' उपक्रम आणि इतर संबंधित घटकांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला, आणि भारतीय सांस्कृतिक वारशाच्या जतनासाठी आणि संवर्धनासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाची प्रशंसा केली.

'आशीर्वाद का दिया' सामूहिकरीत्या प्रज्वलित करून या कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमात ‘अमृत काळा’त सेवा, संस्कृती, राष्ट्र उभारणी आणि विकसित भारत 2047 च्या संकल्पाचा पुनरुच्चार करण्यात आला.

***

NitinFulluke / RajshreeAgashe / DineshYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2311849) अभ्यागत कक्ष : 5