पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांनी वाढदिवसाच्या शुभेच्छांबद्दल उपराष्ट्रपती थिरू सी.पी.राधाकृष्णन जी यांचे आभार मानले

Posted On: 17 SEP 2026 9:03PM by PIB Mumbai


नवी दिल्ली,17 सप्टेंबर 2026

उपराष्ट्रपती थिरू सी.पी. राधाकृष्णन जी यांनी वाढदिवसानिमित्त दिलेल्या स्नेहमयी शुभेच्छांबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे आभार मानले."प्रत्येक नागरिकाला सक्षम करण्यासाठी, विकासाचे लाभ देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचतील याची खात्री करण्यासाठी आणि 'विकसित भारत' घडवण्याचा आपला सामूहिक संकल्प पूर्ण करण्यासाठी आम्ही नव्या ऊर्जेने आणि दृढसंकल्पाने काम करत राहू," असे मोदी यांनी नमूद केले.

मोदी यांनी 'एक्स'या समाज माध्‍यमावर पोस्ट केले:

उपराष्ट्रपती थिरू सी.पी. राधाकृष्णन जी, आपल्या स्नेहपूर्ण आणि विचारप्रवर्तक  शुभेच्छांबद्दल धन्यवाद.

प्रत्येक नागरिकाला सक्षम करण्यासाठी, विकासाचे लाभ देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचतील याची खात्री करण्यासाठी आणि 'विकसित भारत' घडवण्याचा आपला सामूहिक संकल्प पूर्ण करण्यासाठी आम्ही  नव्या ऊर्जेने आणि दृढनिश्चयाने काम करत राहू.

@CPR_VP


सुवर्णा बेडेकर/सुषमा काणे/प्रिती मालंडकर 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2311674) अभ्यागत कक्ष : 5