इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
भाषिणी, करंट एआय आणि कल्प इम्पॅक्ट द्वारे आयोजित व्योम इनोव्हेशन चॅलेंजचा समारोप, भारतासाठी ओपन-सोर्स एआय सोल्यूशन्स सादर केले
Posted On:
16 SEP 2026 7:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली,16 सप्टेंबर 2026
केंद्र सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत डिजिटल इंडिया कॉर्पोरेशनच्या डिजिटल इंडिया भाषिणी विभागाने करंट एआय आणि कल्प इम्पॅक्ट यांच्या सहकार्याने, आयआयआयटी-दिल्ली येथे व्योम इनोव्हेशन चॅलेंजच्या अंतिम फेरीचे आयोजन केले. यामध्ये वैविध्यपूर्ण भारतीय गरजेनुसार ओपन-सोर्स एआय हार्डवेअरचा व्यावहारिक वापर विकसित करणारे संशोधक, विद्यार्थी आणि स्टार्टअप्स एकत्र आले होते.
या चॅलेंजमध्ये सहभागींना भाषिणी आणि करंट एआय यांनी संयुक्तपणे विकसित केलेल्या 'सुनो सूत्र' या ओपन-सोर्स, बहुभाषिक हँडहेल्ड एआय रेफरन्स डिझाइनवर काम करण्यासाठी तसेच एआय हार्डवेअर व सॉफ्टवेअर जनहिताशी निगडित अनुप्रयोगांसाठी आणि स्थानिक वापरासाठी कसे अनुकूलित केले जाऊ शकते, हे शोधण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते.
व्योम इनोव्हेशन चॅलेंजच्या अंतिम फेरीत 10 अंतिम संघांनी त्यांचे वर्किंग प्रोटोटाइप सादर केले. या उपायांमध्ये आरोग्यसेवा, कृषी, कल्याणकारी योजनांची उपलब्धता, कायदेशीर सेवा आणि सुलभता यांसारख्या अनेक महत्वपूर्ण क्षेत्रांचा समावेश होता , जे भारताच्या विविध गरजा आणि वास्तविक जगातील आव्हाने लक्षात घेऊन तयार केलेल्या एआयची क्षमता दर्शवते.

अंतिम फेरीत 10 अंतिम संघांनी प्रोटोटाइपचे सादरीकरण केले, त्यानंतर परीक्षकांनी प्रश्न विचारले आणि अभिप्राय दिला. संघांनी त्यांचे उपाय सादर केले आणि विविध क्षेत्रांतील व समुदायांमधील विशिष्ट आव्हानांना सामोरे जाण्यासाठी ओपन-सोर्स एआय हार्डवेअर कसे वापरता येऊ शकते, हे दाखवून दिले.
या स्पर्धेच्या निमित्ताने ओपन-सोर्स एआय (AI) हार्डवेअर, बहुभाषिक एआय आणि एज एआय (Edge AI) संबंधित व्यापक परिसंस्था एकत्र आली; यात सहभागींनी हार्डवेअर ऑप्टिमायझेशन, मॉडेल क्वांटायझेशन, अचूकता आणि उत्तम कल्पना प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या टप्प्यापर्यंत नेण्याचे मार्ग यांबाबत तज्ज्ञांशी संवाद साधला.
अंतिम फेरीत सुनो सूत्रचे रेफरन्स डिझाइन प्रदर्शित करण्यात आले तसेच व्योम इनोव्हेशन चॅलेंजची उत्क्रांती, सहभागी संघांनी विकसित केलेल्या नव्या वापराच्या पद्धती आणि ओपन-सोर्स एआय हार्डवेअर व एम्बेडेड एआय इकोसिस्टमच्या व्यापक क्षमतेवर चर्चा करण्यात आली.

व्योम इनोव्हेशन चॅलेंजचे विजेते म्हणून चार नवकल्पनांची निवड करण्यात आली. प्रत्येक विजेत्या संघाला त्यांच्या नवोन्मेष आणि जन हिताच्या उपयोजनाच्या क्षमतेची दखल म्हणून बक्षिसाची रक्कम देण्यात आली.
'व्योम इनोव्हेशन चॅलेंज'मध्ये प्रतिष्ठित परीक्षकांमार्फत निवडण्यात आलेल्या पहिल्या चार विजेत्या संघांमध्ये 'टीम आशा सहायक', 'टीम श्रवण', 'टीम संग्रह – अपना साथी' आणि 'टीम सहायक मित्र – A.V.E.R.A. (Autonomous Voice-enabled Edge Rural Advisor)' यांचा समावेश होता.

शैलेश पाटील/सुषमा काणे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2311068)
अभ्यागत कक्ष : 5