पर्यावरण, वन एवं जलवायु परिवर्तन मंत्रालय
केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल राज्यमंत्री कीर्ती वर्धन सिंह यांनी 'जागतिक ओझोन दिन 2026'निमित्त भारताचे 'नेट झिरो पोर्टल' आणि 'एनएपीसीसी (NAPCC) डॅशबोर्ड'चे केले उद्घाटन
हे डिजिटल प्लॅटफॉर्म्स स्वैच्छिक 'नेट झिरो'कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि राष्ट्रीय हवामान मोहिमांच्या देखरेखीला बळकटी देतील
Posted On:
16 SEP 2026 3:27PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 16 सप्टेंबर 2026
केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल राज्यमंत्री कीर्ती वर्धन सिंह यांनी आज मुंबईत 'जागतिक ओझोन दिन 2026 निमित्त भारताचे 'नेट झिरो पोर्टल' आणि 'नॅशनल ॲक्शन प्लॅन ऑन क्लायमेट चेंज' (NAPCC) डॅशबोर्डचे उद्घाटन केले. पारदर्शकता, समन्वय आणि पुरावा -आधारित हवामान कृती बळकट करण्याच्या दिशेने हे दोन डिजिटल उपक्रम एक महत्त्वपूर्ण पाऊल आहेत. 'नेट झिरो'बाबत स्वैच्छिक वचनबद्धता दर्शवण्यासाठी 'नेट झिरो पोर्टल' विविध संस्थांना एक राष्ट्रीय व्यासपीठ उपलब्ध करून देते, तर 'एनएपीसीसी डॅशबोर्ड' हवामान बदलाशी संबंधित राष्ट्रीय मोहिमांच्या प्रगतीवर एकत्रितपणे देखरेख सक्षम करते.
नेट झिरो पोर्टल हे एक केंद्रीकृत डिजिटल व्यासपीठ आहे, जिथे विविध क्षेत्रांतील भारतीय संस्था स्वेच्छेने नेट झिरो वचनबद्धतेसाठी नोंदणी आणि प्रकटीकरण करू शकतात. यात सहभागी होणाऱ्या संस्था त्यांची हरितगृह वायू उत्सर्जन संबंधी माहिती देऊ शकतात, नेट झिरो लक्ष्य घोषित करू शकतात आणि वार्षिक प्रगती अहवाल देऊ शकतात. संस्थांना स्कोप 1 आणि स्कोप 2 उत्सर्जनाबाबत माहिती देण्यास प्रोत्साहित केले जाते, तर स्कोप 3 उत्सर्जनाची माहिती देणे ऐच्छिक आहे.हे पोर्टल संस्थांना नेट झिरोच्या दिशेने पुढील मार्ग आखण्यास मदत करते, स्वच्छ ऊर्जा संक्रमण, ऊर्जा कार्यक्षमता,तंत्रज्ञान विषयक हस्तक्षेप आणि कार्बन निर्मूलनाशी संबंधित उपायांचा समावेश आहे.
हा उपक्रम ऐच्छिक हवामान कृतींना एका समान व्यासपीठावर आणतो, पारदर्शकता वाढवतो आणि विश्वासार्ह दीर्घकालीन हवामान नियोजनास प्रोत्साहन देतो. आपली नेट झिरो लक्ष्ये यशस्वीपणे घोषित करणाऱ्या संस्थांना पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाकडून पोचपावती मिळेल. यात सहभागी संस्था, संघटना आणि उद्योगांच्या घोषणा जनतेपर्यंत पोहचल्यास देशात ऐच्छिक नेट झिरो कृतींचा एकत्रित संग्रह देखील तयार होईल. हे पोर्टल https://netzeroindia.moef.gov.in/ येथे उपलब्ध आहे.
एनएपीसीसी डॅशबोर्ड, एनएपीसीसी अंतर्गत असलेल्या राष्ट्रीय मोहिमांमधील अंमलबजावणी आणि प्रगतीचे एक एकत्रित डिजिटल चित्र उपलब्ध करून देते . हे मोहिमेसंबंधित माहिती आणि निवडक निर्देशांक एका सामायिक व्यासपीठावर एकत्र आणते, ज्यामुळे संबंधित मंत्रालये आणि विभागांना पद्धतशीर देखरेख ठेवणे सोपे होते. हा डॅशबोर्ड आंतर-मंत्रालयीन समन्वय मजबूत करेल, राष्ट्रीय हवामान कृतींच्या पुराव्यावर आधारित मूल्यांकनाला मदत करेल , क्षेत्रीय प्रगतीचे मूल्यांकन करण्यास, अंमलबजावणीतील त्रुटी ओळखण्यास आणि मंत्रालये व विभागांकडून संबंधित माहिती एकत्रित करण्यास मदत करेल. यामुळे देशांतर्गत हवामान कृती आणि भारताच्या आंतरराष्ट्रीय हवामान वचनबद्धता यांच्यातील दुवा अधिक मजबूत होईल अशी अपेक्षा आहे. हा डॅशबोर्ड येथे पाहता येईल: https://napccindia.moef.gov.in/
नेट झिरो पोर्टल आणि एनएपीसीसी डॅशबोर्डचे उद्घाटन यामधून केंद्र सरकारचा तंत्रज्ञान-सक्षम शासन, पारदर्शकता, संस्थात्मक समन्वय आणि पुरावा - आधारित हवामान कृती यांवरील सातत्यपूर्ण भर प्रतिबिंबित होतो. भारताच्या कमी-कार्बन आणि हवामान-अनुकूल भविष्याच्या दिशेने संक्रमणामध्ये व्यापक सहभाग यामुळे सुलभ होईल.
नेहा कुलकर्णी/सुषमा काणे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2310862)
अभ्यागत कक्ष : 11