ऊर्जा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

राष्ट्रीय औष्णिक ऊर्जा महामंडळाच्या पश्चिम क्षेत्र-1 च्या मुंबई इथल्या मुख्यालयाच्या वतीने एनटीपीसी इलेक्ट्रॉन क्विझ 2026-27 या प्रश्नमंजुषा स्पर्धेच्या मुंबई प्रादेशिक फेरीचे आयोजन

Posted On: 15 SEP 2026 4:30PM by PIB Mumbai

मुंबई, 15 सप्टेंबर 2026

राष्ट्रीय औष्णिक ऊर्जा महामंडळाच्या पश्चिम क्षेत्र-1 च्या मुंबई इथल्या मुख्यालयाच्या वतीने येत्या 17 सप्टेंबर 2026 रोजी एनटीपीसी इलेक्ट्रॉन क्विझ 2026-27 या प्रश्नमंजुषा स्पर्धेच्या मुंबई प्रादेशिक फेरीचे आयोजन करण्यात आले आहे.मुंबईतील अंधेरी (पूर्व) इथल्या सिप्झ या विशेष आर्थिक क्षेत्रातील भारत रत्नम – मेगा सीएफसी संकुलात ही फेरी पार पडेल.

व्यवसाय आणि व्यवस्थापनाच्या जगतातील सर्व काही (Anything and Everything from the World of Business and Management) ही या स्पर्धेमागची संकल्पना आहे. या स्पर्धेत सध्या अभियांत्रिकी किंवा व्यवस्थापन शाखेचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचे संघ सहभागी होऊ शकतात. एका संघात जास्तीत जास्त दोन विद्यार्थी असणार आहेत. या स्पर्धेत 100 पेक्षा जास्त संघ सहभागी होतील अशी अपेक्षा आहेत. या स्पर्धेच्या माध्यमातून युवा प्रतिभेतील ज्ञान, विश्लेषणात्मक विचार करण्याची वृत्ती, त्यांच्यातील कुतुहल आणि निकोप स्पर्धेचा गौरवपूर्ण सोहळाच साजरा केला जाणार आहे.

स्पर्धेच्या दिवशी सकाळी 8:00 ते 10:00 या वेळेत 6 व्या मजल्यावरील प्रवेशद्वार क्रमांक 4 आणि 5 वर घटनास्थळीच नोंदणीची सुविधा उपलब्ध असणार आहे. सहभागी होणाऱ्या स्पर्धकांनी महाविद्यालयाचे वैध ओळखपत्र बाळगणे बंधनकारक असेल. या स्पर्धेसाठी कोणतेही नोंदणी किंवा सहभाग शुल्क नसून, शैक्षणिक संस्था एकापेक्षा जास्त संघ या स्पर्धेसाठी पाठवू शकतात.

कोण सहभागी होऊ शकते?

अभियांत्रिकी किंवा व्यवस्थापन शाखेचे शिक्षण घेत असलेले विद्यार्थी.

प्रत्येक संघात दोन सदस्य असणे बंधनकारक.

वैयक्तिक सहभागाला परवानगी नाही.

कोणतेही नोंदणी किंवा सहभाग शुल्क नाही.

शैक्षणिक संस्था त्यांना हवे तितके संघ या स्पर्धेसाठी पाठवू शकतात.

मुंबई प्रादेशिक फेरीची सुरुवात लेखी फेरीने होईल, त्यानंतर अव्वल सहा संघांसाठी मंचावर बहुमाध्यम स्वरुपाची प्रादेशिक अंतिम फेरी आयोजित केली जाईल. यातील अव्वल दोन संघ राष्ट्रीय पातळीवरील फेरीसाठी पात्र ठरतील.

मुंबई प्रादेशिक फेरीसाठीची पारितोषिके:

प्रथम पारितोषिक: प्रति संघ 60,000 रुपये

द्वितीय पारितोषिक: प्रति संघ 40,000 रुपये

तृतीय पारितोषिक: प्रति संघ 20,000 रुपये

उत्तेजनार्थ (चौथा ते सहावा क्रमांक): प्रति संघ 8,000 रुपये

राष्ट्रीय पातळीवरील पारितोषिके:

प्रथम पारितोषिक: प्रति संघ 1,00,000 रुपये

द्वितीय पारितोषिक: प्रति संघ 60,000 रुपये

तृतीय पारितोषिक: प्रति संघ 40,000 रुपये

उत्तेजनार्थ पारितोषिक 1 (चौथा, पाचवा आणि सहावा क्रमांक): प्रति संघ 16,000 रुपये

उत्तेजनार्थ पारितोषिक 2 (उर्वरित 12 संघ): प्रति संघ 8,000 रुपये

प्रादेशिक फेरीसाठी प्रवासाचा परतावा वातानुकूलित 3-स्तरीय रेल्वे भाड्यापुरता मर्यादित असणार आहे. राष्ट्रीय पातळीवरील फेरीसाठी प्रवासाचा परतावा इकॉनॉमी क्लासच्या विमान भाड्यापुरता मर्यादित असणार आहे. राष्ट्रीय पातळीवरील सहभागींसाठी निवास, भोजन आणि स्थानिक वाहतुकीची सोय राष्ट्रीय औष्णिक ऊर्जा महामंडळाद्वारे केली जाणार आहे.

ही प्रश्नमंजुषा स्पर्धा 2004 पासून आयोजित केली जात आहे. राष्ट्रीय औष्णिक ऊर्जा महामंडळाच्या वतीने विद्यार्थ्यांशी जोडून घेण्यासाठी राबवल्या जात असलेल्या अनेक उपक्रमांपैकी हा एक महत्वाचा स्पर्धा उपक्रम आहे. या स्पर्धात्मक उपक्रमाच्या माध्यमातून देशभरात बौद्धिक विकास आणि स्पर्धात्मक वृत्तीला प्रोत्साहन दिले जात आहे.

मुंबई आणि आसपासच्या परिसरातील अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन संस्थांनी स्पर्धेसाठीच्या या आमंत्रणाचा इतरत्रही प्रचार प्रसार करावा, आणि पात्र विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घ्यावा यासाठी त्यांना प्रोत्साहन द्यावे असे आवाहनही राष्ट्रीय औष्णिक ऊर्जा महामंडळाने केले आहे.


पीआयबी मुंबई | राधिका अघोर/तुषार पवार/प्रिती मालंडकर 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2310465) अभ्यागत कक्ष : 9
Read this releasein: English , Urdu , Tamil