संरक्षण मंत्रालय
मलेशियातील लुमुट येथे 'समुद्र लक्ष्मण' या चौथ्या नौदल सरावातील आयएनएस म्हैसूरच्या सहभागाची सांगता
Posted On:
14 SEP 2026 7:04PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 14 सप्टेंबर 2026
भारतीय नौदलाच्या कार्यत्मक तैनातीचा भाग म्हणून, भारतीय नौदलाचे जहाज आयएनएस म्हैसूरने मलेशियातील लुमुट येथे 09 ते 22 सप्टेंबर 2026 या कालावधीत मलेशियाच्या नौदलासोबत 'समुद्र लक्ष्मण' या संयुक्त सरावाच्या चौथ्या आवृत्तीत भाग घेतला.
या सरावामुळे भारतीय नौदल आणि रॉयल मलेशियन नौदलाला व्यावसायिक आणि परिचालनात्मक उपक्रमांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली. बंदर टप्प्यात दोन्ही नौदलांच्या कर्मचाऱ्यांमध्ये व्यावसायिक विचारविनिमय आणि संवाद झाला. यामुळे अनुभवांची देवाणघेवाण सुलभ झाली आणि परस्पर सामंजस्य वाढण्यास मदत झाली.
या सरावाच्या समुद्रातील प्रत्यक्ष कार्यवाहीच्या टप्प्यात आयएनएस म्हैसूरने रॉयल मलेशियन नौदलाच्या ‘केडी लेकीर’ आणि ‘केडी गगाह समुदेरा’ या जहाजांसोबत सराव केला. सहभागी जहाजांनी समन्वित सागरी कवायती केल्या. यामुळे परस्पर कार्यक्षमता वाढवण्याची, कार्यवाहीतील समन्वय सुधारण्याची आणि एकत्रितपणे प्रभावीपणे काम करण्याची क्षमता बळकट करण्याची संधी मिळाली.
या सरावाची पूर्तता भारत आणि मलेशिया यांच्यातील नौदल सहकार्याची वाढती व्याप्ती आणि परिपक्वता दर्शवते. तसेच, दोन्ही नौदलांमध्ये अधिक चांगली परिचालनविषयक समज निर्माण करण्यासाठी सातत्यपूर्ण व्यावसायिक सहभाग आणि व्यावहारिक सहकार्याचे महत्त्वही यातून अधोरेखित होते.
‘समुद्र लक्ष्मण’ हा सराव भारत-मलेशियाच्या विस्तारत असलेल्या सागरी भागीदारीतील आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. 1 जुलै 2026 रोजी झालेल्या 12व्या भारत-मलेशिया उपसमितीच्या बैठकीसह, अलीकडील द्विपक्षीय संवादातून निर्माण झालेल्या गतीवर आधारित, या सरावाने दोन्ही नौदलांमधील सहकार्याचा पाया अधिक भक्कम केला आहे.
(3)_20260914131556_566453.jpeg)
(3)_20260914131609_983e80.jpeg)
(3)_20260914131622_0a86aa.jpeg)
शैलेश पाटील/श्रद्धा मुखेडकर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2310218)
अभ्यागत कक्ष : 7