पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

नांदेडमधील दुर्घटनेत झालेल्या जिवीतहानीबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केले दुःख


पंतप्रधानांकडून पीएमएनआरएफ मधून आर्थिक मदतीची घोषणा

Posted On: 11 SEP 2026 9:11AM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील नांदेड येथे झालेल्या दुर्घटनेत प्राण गमावलेल्यांबद्दल दुःख व्यक्त केले आहे.

दुःखाच्या या कठीण प्रसंगी पंतप्रधानांनी शोकग्रस्त कुटुंबांबद्दल सहवेदना व्यक्त केली आणि जखमी लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली.

मोदी यांनी जाहीर केले की, मृत व्यक्तींच्या निकटवर्तीयांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येकी 2 लाख रुपयांचे अनुदान दिले जाईल. तसेच, जखमींना 50,000 रुपये दिले जातील.

पंतप्रधान कार्यालयाने एक्स या समाजमाध्यमावरील पोस्टमध्ये म्हटले आहे की,

"महाराष्ट्रात नांदेड येथे झालेल्या दुर्घटनेतील जीवितहानीबद्दल ऐकून दुःख झाले. या दुःखद प्रसंगी माझ्या संवेदना शोकाकुल कुटुंबीयांसोबत आहेत. जखमींच्या तब्येतीत लवकर सुधार होण्यासाठी मी प्रार्थना करतो.

प्रत्येक मृत व्यक्तीच्या निकटवर्तीयांना PMNRF मधून ₹2 लाखांची सानुग्रह मदत करण्यात येईल. जखमींना ₹50,000 देण्यात येतील: पंतप्रधान @narendramodi"

***

NehaKulkarni / RajeshShirbhate / DineshYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2309040) अभ्यागत कक्ष : 7