दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारताकडून '6जी नेतृत्व आणि सुरक्षेसाठीच्या कृती आवाहनाला' पाठिंबा; दूरसंचार विभाग हा उपक्रम नेणार पुढे


नॉर्थ कॅरोलिना मधल्या चॅपल हिल इथे आयोजित जी 20 नवोन्मेषसंबंधी मंत्रिस्तरीय बैठकीच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा

खुल्या, परस्पर कार्यक्षम, सुरक्षित आणि लवचिक नव्या टप्प्यातल्या नेटवर्कसाठी सामायिक वचनबद्ता, अशा समान विचारांच्या 20 हून अधिक देशांच्या गटात भारत सहभागी

Posted On: 09 SEP 2026 7:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 9 सप्टेंबर 2026

खुलेपणा, परस्पर कार्यक्षमता, सुरक्षा, लवचिकता, मनुष्यबळ कार्यक्षमता आणि नावीन्य-आधारित स्पर्धेच्या तत्त्वांवर बिनतारी संवादाच्या सहाव्या टप्प्याला आकार देण्यासाठी वचनबद्ध असलेल्या समान विचारांच्या देशांच्या गटात सहभागी होत भारताने '6जी नेतृत्व आणि सुरक्षेसाठीच्या कृती आवाहनाला' पाठिंबा दिला आहे.

हा उपक्रम केंद्रीय दळणवळण आणि ईशान्य क्षेत्र विकास मंत्री ज्योतिरादित्य एम. शिंदे यांच्या दृष्टिकोनाशी सुसंगत असेल. शिंदे यांनी भारताच्या 6जी  मध्ये जगाचे नेतृत्व करण्यासाठी कटिबद्ध असण्यावर नेहमीच भर दिला आहे.

या घोषणेचे महत्त्व अधोरेखित करत केंद्रीय दळणवळण मंत्र्यांनी या घडामोडीवर आपले विचार मांडण्यासाठी समाज माध्‍यमांचा वापर केला.

दूरसंचार विभाग या कृती आवाहनाअंतर्गत भारताचा सहभाग पुढे नेईल.  संबंधित सरकारी संस्था, उद्योग, शैक्षणिक क्षेत्र आणि इतर भागधारकांसोबत पुढील कार्यवाहीचे समन्वयन करेल. कॅनडा, कोस्टा रिका, चेकिया, डेन्मार्क, एस्टोनिया, फ्रान्स, जर्मनी, ग्रीस, होंडुरास, इटली, जपान, लातव्हिया, नॉर्वे, पराग्वे, कोरिया प्रजासत्ताक, रोमानिया, स्वीडन, युनायटेड किंगडम आणि युनायटेड स्टेट्स यांसह या कृती आवाहनाची पुष्टी करणाऱ्या इतर देशांमध्ये भारत सामील झाला आहे.

अमेरिकेच्या जी 20 अध्यक्षतेखाली 1-2 सप्टेंबर 2026 रोजी अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिना इथे आयोजित ' जी 20 नवोन्मेष  मंत्रिस्तरीय बैठकीच्या पार्श्वभूमीवर या पाठिंब्याची घोषणा करण्यात आली. केंद्र सरकारचे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग तसेच इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री जितिन प्रसाद आणि अमेरिकेचे वाणिज्य मंत्री हॉवर्ड लुटनिक यांच्यातल्या हस्तांदोलनाने या घोषणेची नोंद झाली.

या कृती आवाहनाअंतर्गत, तंत्रज्ञान स्पर्धात्मकता, आर्थिक समृद्धी आणि राष्ट्रीय सुरक्षेसाठी सुरक्षित डिजिटल पायाभूत सुविधा आवश्यक आहेत आणि प्रगत दूरसंवाद नेटवर्क हे त्या पायाभूत सुविधांचे प्रवेशद्वार आणि केंद्र दोन्ही आहे, यावर सहभागी देशांचे एकमत आहे.

या कृती आवाहनातून सहभागी देशांसाठी टप्प्याटप्प्याने करायच्या कृती निश्चित करण्यात आल्या आहेत.

या आवाहनाअंतर्गत6 जी संशोधन आणि विकासावर समन्वय आणि माहितीची देवाणघेवाण; जागतिक बाजारपेठेत सुरक्षित आणि लवचिक 5जी आणि 6जी  तंत्रज्ञानाच्या तैनातीस पाठिंबा देण्यासाठी व्यापार आणि विकास वित्त संस्थांमधील सहकार्य; दूरसंचार क्षेत्रातल्या गुंतवणुकीशी संबंधित तांत्रिक आणि धोरणात्मक सायबर सुरक्षा जोखीमांचे मूल्यमापन; पुरवठा साखळीतले बदल आणि असुरक्षिततेबाबत अधिक पारदर्शकता यांचा समावेश आहे.

हे कृती आवाहन स्पष्टतेने नमूद केले आहे  की, कोणत्याही देशाचा यातला सहभाग उद्योग-चलित मानके संस्थांच्या संदर्भात स्वतःची स्वतंत्र स्थिती किंवा स्वायत्तता राखण्यासाठी कोणत्याही देशाच्या अधिकारावर बंधन आणत नाही किंवा त्याला मर्यादा घालत नाही, आणि प्रत्येक सहभागी देशाची पुढील पावले त्याचे राष्ट्रीय प्राधान्यक्रम, संसाधने आणि क्षमतेनुसार भिन्न असतील.

Follow DoT Handles for more: -

X - https://x.com/DoT_India

Insta-  https://www.instagram.com/department_of_telecom?igsh=MXUxbHFjd3llZTU0YQ==

Fb - https://www.facebook.com/DoTIndia

Youtube: https://youtube.com/@departmentoftelecom?si=DALnhYkt89U5jAaa

 

सुवर्णा बेडेकर/ निखिलेश चित्रे/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 


(Release ID: 2308451) अभ्यागत कक्ष : 8