संरक्षण मंत्रालय
जपान एयर सेल्फ-डिफेंस फोर्स (जेएएसडीएफ) सोबत हवाई संरक्षण सराव: 'वीर गार्डियन-2026
Posted On:
08 SEP 2026 9:33PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 8 सप्टेंबर 2026
भारतीय हवाई दल आणि जपान एअर सेल्फ-डिफेन्स फोर्स (जेएएसडीएफ) यांच्यात 9 सप्टेंबर 26 ते 22 सप्टेंबर 2026 दरम्यान जोधपूर येथील हवाई दलाच्या तळावर 'वीर गार्डियन-2026' हा द्विपक्षीय हवाई सराव आयोजित केला जाणार आहे.
या सरावात भारतीय हवाई दल स्वदेशी बनावटीचे 'हलके लढाऊ विमान ' (LCA) तेजस, तसेच सुखोई--30 एमकेआय आणि राफेल सारख्या विविध आघाडीच्या लढाऊ विमानांसह सहभागी होणार आहे. तर, जेएएसडीएफ F-2A लढाऊ विमानांसह या सरावात सहभागी होणार आहे.
चौदा दिवस चालणाऱ्या या सरावादरम्यान, सहभागी हवाई योद्धे प्रगत मोहिमा हाती घेतील आणि व्यापक व्यावसायिक देवाणघेवाण करतील. या कार्यक्रमात मोहिमेचे नियोजन संबंधी बैठका, विषयातील तज्ज्ञांचे आदानप्रदान आणि अभियांत्रिकी तसेच एरोस्पेस सुरक्षिततेशी संबंधित बाबींवर कर्मचाऱ्यांमधील संवाद यांचा समावेश आहे; यामुळे दोन्ही हवाई दलांमध्ये गहन कार्यात्मक समन्वय साधला जाईल.
'वीर गार्डियन-26' हा सराव सामरिक कौशल्य आणि एरोस्पेस क्षेत्रातील परिचालन समन्वय वाढवून भारत आणि जपान यांच्यातील दृढ होत चाललेल्या धोरणात्मक भागीदारीचे प्रतीक आहे. हा सराव दोन्ही देशांमधील मैत्रीचे आणि सामरिक सहकार्याचे दीर्घकालीन बंध अधिक दृढ करतो.
शैलेश पाटील/सुषमा काणे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2308082)
अभ्यागत कक्ष : 9