संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारतीय हवाई दल करणार ड्रोनेथॉन 2026 चे आयोजन

Posted On: 08 SEP 2026 4:26PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 8 सप्टेंबर 2026

भारतीय हवाई दल ‘ड्रोनेथॉन 2026’ चे आयोजन करत आहे. देशातील उत्पादकांना मानवरहित हवाई प्रणाली (UAS) आणि प्रति-मानवरहित हवाई प्रणाली (CUAS) मधील त्यांची क्षमता आणि प्रगती प्रदर्शित करण्याची संधी देणे हा यामागचा उद्देश आहे. सर्व संबंधितांना, उदयोन्मुख ड्रोन आणि प्रति-ड्रोन तंत्रज्ञानाची परिचालनात्मक प्रात्यक्षिके बघता यावी आणि त्याद्वारे त्यांच्या परस्पर शिक्षणाला चालना मिळावी हा या उपक्रमाचा  उद्देश आहे.

हा कार्यक्रम 14  ते 16  सप्टेंबर 2026  दरम्यान जैसलमेर येथील पोखरण रेंजमध्ये होणार आहे. या कार्यक्रमात स्थिर प्रदर्शन आणि थेट प्रात्यक्षिकांचा समावेश आहे. यामुळे  ड्रोन वापराचा युद्धावर होणार परिणाम आणि सध्याच्या काळात त्यावर कशी मात करता येईल हे ओळखण्यास मदत होईल. प्रामुख्याने  देखरेख आणि टेहळणी, स्वायत्त कार्यप्रणाली, समूह तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक युद्ध आदि बाबींवर विशेषकरून लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे.

हा उपक्रम भारताच्या ‘आत्मनिर्भर भारत’ या राष्ट्रीय दृष्टिकोनाच्या अनुषंगाने,  उद्योग तज्ञ, स्टार्ट-अप्स आणि नवोन्मेषकांना एकत्रित आणून,  स्वदेशी संरक्षण परिसंस्थेला बळकट करणे, हे ड्रोनेथॉन 2026 चे उद्दिष्ट आहे. अशा उपक्रमांच्या माध्यमातून, भारतीय हवाई दल   वेगाने बदलणाऱ्या कार्यक्षेत्रातील सुरक्षा आव्हानांना तोंड देण्यास सक्षम, तांत्रिकदृष्ट्या प्रगत, स्वदेशी आणि भविष्यासाठी सज्ज असे दल उभारण्यासाठी कटिबद्ध आहे.

 
शैलेश पाटील/सविता म्हसकर/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2307869) अभ्यागत कक्ष : 12