पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

शिक्षण हे मानवतेला आकार देणारे पवित्र कार्य असल्याचे अधोरेखित करणारा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा लेख पंतप्रधानांनी केला सामाईक

Posted On: 05 SEP 2026 5:42PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 5 सप्‍टेंबर 2026

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी लिहिलेला लेख सामाईक केला आहे.

ज्ञान, कौशल्ये, मूल्ये आणि प्रेरणा रुजवून विद्यार्थ्यांच्या भवितव्याला शिक्षक आकार देतात, असे राष्ट्रपती आपल्या या लेखात सांगतात. मानवतेला आकार देण्याचे पवित्र कार्य म्हणून अध्यापनाकडे पाहिले पाहिजे, तसेच विद्यार्थ्यांमध्ये स्वतंत्र विचार आणि जिज्ञासा वाढीस लावली पाहिजे, यावर या लेखात प्रकाश टाकण्यात आला आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले. सांस्कृतिक वारशाचे जतन, वैज्ञानिक दृष्टिकोन, अंत्योदयाची संकल्पना, पर्यावरण संरक्षण आणि ‘राष्ट्र प्रथम’ या मूल्यांना जपणारा चांगला माणूस बनण्यासाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे, असे आवाहनही राष्ट्रपतींनी केले आहे.

पंतप्रधान कार्यालयाने ‘एक्स’वरील पोस्टमध्ये सांगितले:

“राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सांगितले आहे की, शिक्षक ज्ञान, कौशल्ये, मूल्ये आणि प्रेरणा रुजवून विद्यार्थ्यांच्या भवितव्याला आकार देतात.

शिक्षण हे मानवतेला आकार देणारे, स्वतंत्र विचार आणि जिज्ञासेला प्रोत्साहन देणारे पवित्र कार्य असल्याचे त्यांनी अधोरेखित केले आहे.

सांस्कृतिक वारसा, वैज्ञानिक दृष्टिकोन, अंत्योदयाची संकल्पना, पर्यावरण संरक्षण आणि ‘राष्ट्र प्रथम’ या मूल्यांना जपणारा  चांगला माणूस बनण्यासाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.”

 

 

* * *

निलिमा चितळे/गजेंद्र देवडा/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2306984) अभ्यागत कक्ष : 9