पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

EOS-05 उपग्रहासह GSLV-F17 च्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल पंतप्रधानांनी केली इस्रोची प्रशंसा

Posted On: 04 SEP 2026 5:22PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 4 सप्‍टेंबर 2026

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (ISRO) आणखी एका उत्कृष्ट कामगिरीचे कौतुक केले आहे. हा देशासाठी अत्यंत अभिमानाचा क्षण असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

जिओ सिंक्रोनस कक्षेतून छायाचित्रे घेणारा भारताचा पहिलाच उपग्रह EOS-05 वाहून नेणाऱ्या GSLV-F17 चे यशस्वी प्रक्षेपण हे भारताच्या अंतराळ क्षेत्रातील उत्कृष्टता, नवोन्मेष आणि वाढत्या क्षमतांचे प्रतीक आहे, असे पंतप्रधानांनी नमूद केले.

इस्रो आणि भारतीय उद्योगांमधील वाढती भागीदारी अंतराळ कार्यक्रमाला नवीन ताकद आणि विस्तार देत आहे, तसेच संपूर्ण अंतराळ परिसंस्थेमध्ये  भारताच्या क्षमतांचा विस्तार करत असल्याचे त्यांनी सांगितले.

एक्सवरील एका पोस्टमध्ये पंतप्रधान म्हणालेः

"इस्रोची  आणखी एक असामान्य कामगिरी आणि आपल्या देशासाठी अत्यंत अभिमानाचा क्षण!

जिओ सिंक्रोनस कक्षेतून छायाचित्रे घेणारा भारताचा पहिलाच उपग्रह EOS-05 वाहून नेणाऱ्या GSLV-F17 चे यशस्वी प्रक्षेपण हे भारताच्या अंतराळ क्षेत्रातील उत्कृष्टता, नाविन्यता आणि वाढत्या क्षमतांचे प्रतीक आहे.

इस्रो आणि भारतीय उद्योगांमधील वाढती भागीदारी आपल्या अंतराळ कार्यक्रमाला नवीन ताकद आणि विस्तार देत आहे, तसेच संपूर्ण अंतराळ परिसंस्थेमध्ये भारताच्या क्षमतांचा विस्तार करत आहे."

 

* * *

नेहा कुलकर्णी/शैलेश पाटील/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2306754) अभ्यागत कक्ष : 17