संरक्षण मंत्रालय
लोकायन 2026 – भारतीय नौदलाचे 'आयएनएस सुदर्शनी' हे शिडाचे प्रशिक्षण जहाज बार्सिलोना येथे दाखल
Posted On:
02 SEP 2026 6:29PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 2 सप्टेंबर 2026
भारतीय नौदलाचे 'आयएनएस सुदर्शनी' हे शिडाचे प्रशिक्षण जहाज सध्या सुरु असलेल्या ‘लोकायन 26’ या सागरी मोहिमेचा भाग म्हणून 01 सप्टेंबर 2026 रोजी स्पेनमधील बार्सिलोना येथे पोहोचले.
बार्सिलोना येथील वास्तव्यादरम्यान, हे जहाज स्पॅनिश नौदल आणि इतर सागरी क्षेत्रातील संबंधित घटकांबरोबर व्यावसायिक आणि सांस्कृतिक उपक्रमांमध्ये सहभागी होईल. जहाजावरील सागरी प्रशिक्षार्थी व्यावसायिक संवाद आणि सागरी कौशल्यविषयक देवाणघेवाण, यामध्ये सहभागी होतील.
आयएनएस सुदर्शनी 04 सप्टेंबर 2026 रोजी अभ्यागतांसाठी खुले राहील. भारताच्या सागरी परंपरा आणि नौदल मोहिमांची भावना अनुभवण्याची संधी मिळेल.
हा प्रवास भारताच्या सागरी क्षेत्रातील प्रयत्नांचे प्रतीक असून, तो जागतिक सागरी उपक्रमांमधील भारताचे महत्वाचे स्थान आणि सागरी नौकानयन मोहिमांमधील व्यावसायिक प्रशिक्षण आणि उत्कृष्टतेप्रति भारतीय नौदलाची वचनबद्धता अधोरेखित करतो.
(7)_20260902150930_ace044.jpeg)
(6)_20260902150944_d2ac30.jpeg)
* * *
शैलेश पाटील/राजश्री आगाशे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2306041)
अभ्यागत कक्ष : 6