रेल्वे मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारतीय रेल्वेने दिली मुरादाबाद विभागाच्या उर्वरित 712 मार्ग किलोमीटरवर 'कवच 4.0' साठी 170 कोटी रुपयांच्या तरतुदीला मंजुरी

Posted On: 01 SEP 2026 1:21PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 1 सप्‍टेंबर 2026

 

भारतीय रेल्वेने उत्तर रेल्वेच्या मुरादाबाद विभागातील उर्वरित 712 मार्ग किलोमीटर (Rkm) वर  'कवच आवृत्ती 4.0' साठी एकूण 170 कोटी रुपयांच्या तरतुदीला मंजुरी दिली आहे.

ही मंजूर झालेली कामे स्वदेशी ऑटोमॅटिक ट्रेन प्रोटेक्शन (ATP) प्रणालीच्या तैनातीद्वारे  या विभागाच्या रेल्वे सुरक्षा पायाभूत सुविधांना बळकट करतील. 'कवच 4.0' ची अंमलबजावणी निवडलेल्या विभागांमधील रेल्वे परिचालनासाठी सुरक्षेचा अधिक प्रगत स्तर उपलब्ध करेल.

स्वदेशी कवच तंत्रज्ञानासह रेल्वे सुरक्षेचे सक्षमीकरण

'कवच' ही रेल्वे गाड्यांच्या परिचालनादरम्यान सुरक्षा वाढवण्यासाठी रचना केलेली स्वदेशी विकसित स्वयंचलित ट्रेन संरक्षण (ATP) प्रणाली आहे. ही प्रणाली 'सिग्नल पासिंग एट डेंजर' (SPAD) रोखण्यास मदत करते, असुरक्षित परिस्थिती टाळण्यासाठी आवश्यकतेनुसार स्वयंचलितपणे ब्रेक लावते, गंभीर परिस्थितींमध्ये ट्रेनच्या गतीवर नियंत्रण ठेवते आणि रेल्वेगाड्यांची टक्कर होण्याचा धोका लक्षणीयरीत्या कमी करते.

हा उपक्रम भारतीय रेल्वेच्या आपल्या नेटवर्कवर कवचचा विस्तार करण्याच्या आणि रेल्वे सिग्नलिंग व ट्रेन संरक्षण प्रणालीचे आधुनिकीकरण करण्याच्या सततच्या प्रयत्नांचा एक भाग आहे.

 

* * *

आशिष सांगळे/शैलेश पाटील/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2305391) अभ्यागत कक्ष : 6