संरक्षण मंत्रालय
नवी दिल्लीत चौथ्या 'ट्राय-सर्व्हिसेस फ्युचर वॉरफेअर कोर्स'ची सांगता
Posted On:
30 AUG 2026 10:09PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 30 ऑगस्ट 2026
हेडक्वार्टर्स इंटिग्रेटेड डिफेन्स स्टाफ (HQ IDS) यांच्या अधिपत्याखाली आणि सेंटर फॉर जॉइंट वॉरफेअर स्टडीज (CENJOWS) यांच्या समन्वयाने आयोजित करण्यात आलेल्या ‘ट्राय-सर्व्हिसेस फ्युचर वॉरफेअर कोर्स’ या त्रि-सेवा भविष्यकालीन युद्धतंत्र अभ्यासक्रम’च्या चौथ्या आवृत्तीचा समारोप 30 ऑगस्ट 2026 रोजी नवी दिल्लीतील माणेकशॉ सेंटर येथे झाला. चार आठवड्यांच्या या अभ्यासक्रमात व्यावसायिक लष्करी शिक्षणासोबतच विविध विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली. युद्धाच्या भविष्यातील स्वरूपाला आकार देणाऱ्या उदयोन्मुख प्रवृत्तींचा अभ्यास करण्याच्या उद्देशाने आयोजित या अभ्यासक्रमात भूदल , नौदल आणि हवाई दल यांच्या अधिकाऱ्यांसह सरकारी संस्था, शैक्षणिक क्षेत्र, उद्योग आणि धोरणात्मक विचारमंचांतील प्रतिनिधी सहभागी झाले होते.
या अभ्यासक्रमाच्या पाठ्यक्रमात भू-राजकीय घडामोडी, कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजन्स-ए आय), अनु अणू रेणीव पुंजकीय (क्वांटम) तंत्रज्ञान, सायबर आणि संज्ञानात्मक/बौद्धिक-मानसिक युद्ध (कॉग्निटिव्ह वॉरफेअर), माहिती युद्ध, स्वायत्त प्रणाली, भू, सागरी, हवाई आणि अंतराळ क्षेत्रातील भविष्यातील मोहिमा, चकमकी (ग्रे-झोन ऑपरेशन्स), बहु-क्षेत्रीय कारवाया (मल्टी-डोमेन ऑपरेशन्स) आणि तंत्रज्ञानाधारित युद्धाचा समावेश होता. सहभागींनी व्याख्याने, विचारमंथन सत्रे,संभाव्य परिस्थितीजन्य सराव (सिनेरिओ-बिल्डिंग), संज्ञानात्मक युद्धाचे प्रात्यक्षिक सराव (कॉग्निटिव्ह वॉरफेअर सिम्युलेशन्स), प्रत्यक्ष क्षेत्र भेटी आणि सहभागींच्या सादरीकरणाद्वारे वरिष्ठ लष्करी अधिकारी, धोरणकर्ते, शास्त्रज्ञ, उद्योगपती आणि विषय तज्ज्ञांशी संवाद साधला.
संरक्षण विभाग प्रमुख (चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल) एन. एस. राजा सुब्रह्मण्यम यांनी उपस्थितांशी संवाद साधून या अभ्यासक्रमाबाबत त्यांची मते जाणून घेतली. तसेच, कार्यक्रमाची उपयुक्तता आणि प्रासंगिकता अधिक वाढवण्यासाठी भविष्यातील आवृत्त्यांमध्ये समाविष्ट करता येतील अशा उदयोन्मुख क्षेत्रांबाबत आणि अतिरिक्त विषयांबाबत सूचना करण्यास सहभागी अधिकाऱ्यांना प्रोत्साहित करण्यात आले. एकात्मिक परिसंस्थेत तिन्ही दलांची कार्यात्मक आणि उपक्रमात्मक क्षमता वाढवण्यासाठी परंपरागत चौकटीबाहेरचा विचार करण्यावरही या अभ्यासक्रमात विशेष भर देण्यात आला.
या समारोप कार्यक्रमात चीफ ऑफ इंटिग्रेटेड डिफेन्स स्टाफ टू द चेअरमन, चीफ्स ऑफ स्टाफ कमिटी एअर मार्शल तेजिंदर सिंह यांच्या हस्ते सहभागी अधिकाऱ्यांना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. डिफेन्स रिसर्च अँड इनोव्हेशन फाउंडेशन आणि आयआयटी रोपडचे व्यवस्थापकीय संचालक लेफ्टनंट जनरल एस. एस. महाल (निवृत्त) यांच्या हस्ते सहभागी अधिकाऱ्यांना भविष्यकालीन युद्धशास्त्र (‘फ्युचर वॉरफेअर’)मधील पदव्युत्तर पदविका प्रदान करण्यात आली.
चौथ्या आवृत्तीने युद्धाच्या बदलत्या स्वरूपाला सामोरे जाण्यासाठी लष्करी नेतृत्वाला सज्ज करण्याच्या दृष्टीने संयुक्त शिक्षण, तांत्रिक जागरूकता, धोरणात्मक दूरदृष्टी आणि कार्यात्मक सज्जतेचे महत्त्व अधोरेखित केले आहे. या अभ्यासक्रमाची पाचवी आवृत्ती 16 नोव्हेंबर ते 11 डिसेंबर 2026 या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे.
* * *
शैलेश पाटील/आशुतोष सावे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2304792)
अभ्यागत कक्ष : 7