पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

महात्मा अय्यंकाली यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी वाहिली आदरांजली

Posted On: 28 AUG 2026 1:35PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज महात्मा अय्यंकाली यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली आहे.

आपले जीवन वंचितांचे सक्षमीकरण आणि कल्याण यासाठी समर्पित करणाऱ्या महात्मा अय्यंकाली यांना मोदी यांनी सामाजिक न्यायाचे महान प्रणेते म्हणून स्मरले आहे. वंचितांना शैक्षणिक संधी मिळवून देणे, शेतमजुरांचे जीवनमान सुधारणे आणि गरिबांची सेवा करणे या त्यांच्या प्रयत्नांचा विशेष उल्लेख पंतप्रधानांनी केला. 

पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले:

महात्मा अय्यंकाली यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली!

सामाजिक न्यायाचे एक महान प्रणेते म्हणून त्यांचे स्मरण केले जाते. वंचितांसाठी शैक्षणिक संधी मिळवून देणे, शेतमजुरांचे जीवनमान सुधारणे आणि गरिबांची सेवा करणे यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न आजही अत्यंत प्रेरणादायी आहेत. त्यांचे जीवन सामाजिक सक्षमीकरणासाठी काम करणाऱ्या सर्वांना शक्ती देते.

***

निलिमा चितळे/नंदिनी मथुरे/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2304254) अभ्यागत कक्ष : 16