पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांनी श्री नारायण गुरू यांना त्यांच्या जयंतीनिमित्त वाहिली आदरांजली

Posted On: 28 AUG 2026 1:22PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांनी आज श्री नारायण गुरू यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली.  एक महान समाजसुधारक, आध्यात्मिक नेते आणि विचारवंत अशा शब्दात पंतप्रधानांनी श्री नारायण गुरू यांचे वर्णन  केले. नारायण गुरु यांनी प्रतिष्ठा आणि करुणेवर आधारित समाज घडवण्यासाठी आपले जीवन समर्पित केले, असे त्यांनी सांगितले.

पंतप्रधानांनी एक्सवर पोस्ट केलेः

श्री नारायण गुरू यांना त्यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन!

एक उत्तुंग समाजसुधारक, आध्यात्मिक नेते आणि विचारवंत, ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य प्रतिष्ठा आणि करुणेवर आधारित समाज घडवण्यासाठी समर्पित केले. त्यांच्या विचारांनी अगणित लोकांना बळ दिले. शिक्षण आणि ज्ञानावर त्यांनी दिलेला भर तितकाच उल्लेखनीय होता."

***

नेहा कुलकर्णी/शैलेश पाटील/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2304166) अभ्यागत कक्ष : 12