संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

समर्थक सुपूर्द ! – भारतीय नौदलाचे पहिले स्वदेशी बनावटीचे बहुपयोगी जहाज

Posted On: 27 AUG 2026 8:35PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 27 ऑगस्‍ट 2026

 

समर्थक, हे  भारतातील, लार्सन अँड टुब्रो लिमिटेड कंपनीच्या कट्टूपल्ली इथे विकसित करण्यात आलेले देशातले पहिले बहुपयोगी जहाज (एमपीव्ही), असून, ते आज म्हणजेच 27 ऑगस्ट 2026 रोजी, भारतीय नौदलाला सुपूर्द करण्यात आले.

या जहाजाच्या बांधणीत, देशातच तयार झालेली 75 टक्क्यांपेक्षा अधिक सामग्री वापरण्यात आली असून, बहुपयोगी चाचणी आणि मूल्यमापन प्लॅटफॉर्म म्हणून त्याची रचना करण्यात आली आहे. याशिवाय, सागरी निरीक्षण आणि टेहळणी, समुद्रातील गस्त तसेच आवश्यकतेनुसार मानवतावादी मदत आणि आपत्ती निवारण कार्यवाहीसाठी वापरता येईल, अशा पद्धतीने ते विकसित करण्यात आले आहे.  

या जहाजाला, या जहाजाला ‘समर्थक’ असे समर्पक नाव देण्यात आले आहे. ‘समर्थक’ म्हणजे पाठिंबा देणारा किंवा सहकार्य करणारा. नौदलाच्या विविध मोहिमा पार पाडण्यासाठी विश्वासार्हतेने  सहकार्य करणारी भूमिका या जहाजाच्या बांधणीमागचा उद्देश स्पष्ट करते. आपल्या नावाप्रमाणेच समर्थक हे केवळ एका विशिष्ट कार्यापुरते मर्यादित नसून, विविध प्रकारच्या उपक्रमांना सहाय्य करण्यासाठी त्याची रचना करण्यात आली आहे. त्यामुळे हे जहाज बहुपयोगी ठरते.  

समर्थक हे जहाज आज भारतीय नौदलाला सुपूर्द करण्यात आले, हा भारतीय नौदलाच्या स्वदेशी जहाजबांधणीच्या प्रवासातील आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरला आहे. तसेच, सरकारच्या ‘आत्मनिर्भर भारत’ या संकल्पनेला यामुळे पुन्हा एकदा बळकटी मिळाली आहे. देशांतर्गत स्वयंपूर्ण संरक्षण औद्योगिक व्यवस्था उभारण्याच्या भारताच्या प्रयत्नांचे समर्थक हे एक महत्वाचे उदाहरण ठरले आहे.

 

* * *

सुवर्णा बेडेकर/राधिका अघोर/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2303951) अभ्यागत कक्ष : 9