संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

लोकायन 2026 – आयएनएस सुदर्शनी पोर्तुगालमधील लिस्बन येथे दाखल

प्रविष्टि तिथि: 23 AUG 2026 12:37PM by PIB Mumbai


भारतीय नौदलाचे नौकानयन प्रशिक्षण जहाज आयएनएस सुदर्शनी हे 22 आॅगस्ट 2026 रोजी ‘लोकायन 26’ महासागरीय मोहिमेअंतर्गत पोर्तुगालमधील लिस्बन येथे दाखल झाले. तीन डोलकाठ्यांचे हे जहाज टॅगस नदीमार्गे दिमाखात लिस्बनमध्ये दाखल झाले त्यावेळी पारंपरिक नौकानयन आणि समुद्रप्रवासातील कौशल्यांचे दर्शन घडले.

लिस्बनमधील मुक्कामादरम्यान जहाजावरील खलाशी आणि प्रशिक्षणार्थी हे  पोर्तुगीज नौदलाचे वरिष्ठ अधिकारी, स्थानिक प्रशासन आणि भारतीय वंशाच्या समुदायातील सदस्यांसोबत व्यावसायिक देवाणघेवाण, परस्पर जहाजभेटी तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होतील.

लिस्बनला दिलेली ही भेट सात महिन्यांच्या प्रवासातील जहाजाची 15 वी बंदरभेट आहे. या भेटीमुळे भारताचे जगभरातील दीर्घकालीन सागरी संबंध आणि सद्भावनेची भावना अधोरेखित होत आहे. ‘लोकायन 26’चा एक भाग म्हणून आयएनएस सुदर्शिनी मैत्री, सहकार्य आणि सौहार्दाचा संदेश पुढे नेत असून, भागीदार देशांसोबतचे संबंध अधिक दृढ करण्यासाठी योगदान देत आहे.

***

राधिका अघोर/नितीन गायकवाड/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2302517) आगंतुक पटल : 8
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Gujarati , Tamil