कृषी मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

देशातील खरीप पिकांखालील क्षेत्राची 14 ऑगस्ट 2026 ची प्रगती

प्रविष्टि तिथि: 17 AUG 2026 9:43PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 17 ऑगस्‍ट 2026

 

क्षेत्र: लाख हेक्टरमध्ये

अ. क्र.

पिके

लागवडीखालीली सामान्य क्षेत्र (2020-21 ते 2024-25)

लागवडीखालील क्षेत्राची अंतिम व्याप्ती 2025

लागवडीखालील क्षेत्र

2026

2025

2025 च्या तुलनेत वाढ (+)/ घट (-)

1

तांदूळ

412.00

446.70

379.07

393.44

-14.37

2

कडधान्ये

123.64

118.97

108.14

108.49

-0.35

a

तुरी

44.32

44.60

40.31

42.01

-1.69

b

उडीद

29.60

21.26

23.52

20.79

2.73

c

मूग

35.48

37.45

32.05

33.42

-1.37

d

कुळीथ (हुलगा)

1.48

 

0.19

0.18

0.01

e

मटकी

9.69

 

8.92

8.69

0.23

f

इतर कडधान्ये

3.07

15.66

3.14

3.40

-0.27

3

श्री अन्न आणि भरड धान्ये

182.63

192.12

172.96

177.13

-4.17

a

ज्वारी

14.44

12.10

13.30

12.61

0.69

b

बाजरी

70.94

63.80

63.98

63.29

0.69

c

नाचणी (रागी)

12.01

13.46

3.46

5.26

-1.80

d

लहान भरड धान्ये

4.47

4.15

3.83

3.92

-0.09

e

मका

80.77

98.61

88.39

92.06

-3.67

4

तेलबिया

200.08

196.38

184.46

185.36

-0.89

a

भुईमूग

46.79

50.29

48.03

47.01

1.02

b

सोयाबीन

128.71

123.86

120.84

122.61

-1.76

c

सूर्यफूल

1.20

0.88

1.06

0.61

0.46

d

तीळ

12.88

9.63

10.35

8.73

1.63

e

कारळे (नायगर)

1.01

0.83

0.24

0.16

0.08

f

एरंडी

9.49

10.89

3.83

6.19

-2.35

g

इतर तेलबिया

0.00

 

0.10

0.06

0.04

5

ऊस

54.20

58.84

58.31

58.62

-0.31

6

ताग आणि मेस्ता

6.40

6.06

6.34

6.23

0.11

7

कापूस

125.51

115.20

107.30

108.26

-0.96

 

एकूण

1104.46

1134.27

1016.57

1037.52

-20.95

 

तांदूळ: गतवर्षीच्या याच कालावधीतील 393.44 लाख हेक्टरच्या तुलनेत सुमारे 379.07 लाख हेक्टर क्षेत्रावर तांदळाची लागवड झाली असल्याचे नोंदवले गेले आहे. लागवड क्षेत्रात 14.37 लाख हेक्टरची घट दिसून आली आहे. लागवड क्षेत्रात झालेली प्रमुख घट कर्नाटक (2.86 लाख हेक्टर), झारखंड (2.26 लाख हेक्टर), महाराष्ट्र (2.25 लाख हेक्टर), ओडिशा (2.09 लाख हेक्टर), मध्य प्रदेश (1.64 लाख हेक्टर), तेलंगणा (1.49 लाख हेक्टर), तमिळनाडू (1.17 लाख हेक्टर), आंध्र प्रदेश (1.14 लाख हेक्टर), गुजरात (0.83 लाख हेक्टर), पश्चिम बंगाल (0.87 लाख हेक्टर), उत्तर प्रदेश (0.58 लाख हेक्टर) आणि बिहार (0.52 लाख हेक्टर) या राज्यांमध्ये नोंदवली गेली आहे. तर आसाम (3.93 लाख हेक्टर), उत्तराखंड (0.35 लाख हेक्टर) या राज्यांमध्ये लागवड क्षेत्रात वाढ नोंदवली गेली आहे.

कडधान्ये: गतवर्षीच्या याच कालावधीतील 108.49 लाख हेक्टरच्या तुलनेत कडधान्य लागवडीखाली सुमारे 108.14 लाख हेक्टर क्षेत्राची नोंद झाली आहे. यात 0.35 लाख हेक्टरची घट दिसून आली आहे. लागवड क्षेत्रात झालेली मुख्य घट कर्नाटक (4.16 लाख हेक्टर), महाराष्ट्र (2.70 लाख हेक्टर), ओडिशा (0.64 लाख हेक्टर), तमिळनाडू (0.13 लाख हेक्टर) आणि बिहार (0.14 लाख हेक्टर) या राज्यांमध्ये नोंदवली गेली आहे. तर उत्तर प्रदेश (4.25 लाख हेक्टर), राजस्थान (0.93 लाख हेक्टर), छत्तीसगड (0.40 लाख हेक्टर), आंध्र प्रदेश (0.35 लाख हेक्टर), तेलंगणा (0.34 लाख हेक्टर), मध्य प्रदेश (0.14 लाख हेक्टर) या राज्यांमध्ये अधिक क्षेत्र लागवडीखाली असल्याचे नोंदवले गेले आहे.

श्री अन्न आणि भरड धान्ये: गतवर्षीच्या याच कालावधीतील 177.13 लाख हेक्टरच्या तुलनेत श्री अन्न आणि भरड धान्यांखालील लागवडीचे क्षेत्र सुमारे 172.96 लाख हेक्टर क्षेत्र इतके असल्याचे नोंदवले गेले आहे. यात 4.17 लाख हेक्टरची घट दिसून आली आहे. लागवड क्षेत्रात झालेली मुख्य घट कर्नाटक (7.00 लाख हेक्टर), महाराष्ट्र (2.46 लाख हेक्टर), हरयाणा (0.59 लाख हेक्टर), तमिळनाडू (0.30 लाख हेक्टर), तेलंगणा (0.31 लाख हेक्टर), आंध्र प्रदेश (0.36 लाख हेक्टर), जम्मू आणि काश्मीर (0.19 लाख हेक्टर) आणि गुजरात (0.09 लाख हेक्टर) या राज्यांमध्ये नोंदवली गेली आहे. तर राजस्थान (2.15 लाख हेक्टर), छत्तीसगड (1.53 लाख हेक्टर), मध्य प्रदेश (0.92 लाख हेक्टर), ओडिशा (0.68 लाख हेक्टर), उत्तर प्रदेश (0.62 लाख हेक्टर), बिहार (0.59 लाख हेक्टर), उत्तराखंड (0.42 लाख हेक्टर), झारखंड (0.20 लाख हेक्टर) आणि हिमाचल प्रदेश (0.09 लाख हेक्टर) इत्यादी राज्यांमध्ये लागवडीखाली क्षेत्र अधिक असल्याचे नोंदवले गेले आहे.

तेलबिया: गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील 185.36 लाख हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत यावर्षी तेलबियांची पेरणी सुमारे 184.46 लाख हेक्टर क्षेत्रावर झाली असून, यात 0.89 लाख हेक्टर क्षेत्राची घट झाल्याचे दिसून येत आहे. ज्या राज्यांमध्ये प्रामुख्याने ही घट दिसून आली ती राज्ये याप्रमाणे – राजस्थान (3.40 लाख हेक्टर), महाराष्ट्र (0.56 लाख हेक्टर), गुजरात (1.00 लाख हेक्टर), कर्नाटक (0.44 लाख हेक्टर), तामिळनाडू (0.13 लाख हेक्टर) आणि ओडिशा (0.16 लाख हेक्टर). तर, उत्तर प्रदेश (3.89 लाख हेक्टर), मध्य प्रदेश (0.68 लाख हेक्टर) आणि आसाम (0.10 लाख हेक्टर) इत्यादी राज्यांमध्ये तेलबियांच्या लागवड क्षेत्रात वाढ झालेली दिसून येत आहे.

ऊस: मागील वर्षीच्या याच कालावधीतील 58.62 लाख हेक्टर पेरणीच्या तुलनेत यावर्षी सुमारे 58.31 लाख हेक्टर क्षेत्रात उसाची लागवड झाली असून त्यात 0.31 लाख हेक्टरची घट झालेली दिसून येत आहे. उत्तराखंड (0.20 लाख हेक्टर), महाराष्ट्र (0.14 लाख हेक्टर), पंजाब (0.14 लाख हेक्टर), मध्य प्रदेश (0.12 लाख हेक्टर) इत्यादी राज्यांमध्ये घट झाली असून,  उत्तर प्रदेश (0.36 लाख हेक्टर), हरियाणा (0.11 लाख हेक्टर) इत्यादी राज्यांमध्ये ऊसाच्या लागवडीत वाढ  झाल्याचे  नोंदवण्यात आले आहे.

ताग आणि मेस्ता (अंबाडी): गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील 6.23  लाख हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत, ताग आणि मेस्ता पिकांखालील क्षेत्र सुमारे 6.34 लाख हेक्टर असल्याचे नोंदवले गेले आहे. अशा प्रकारे, या दोन्ही पिकांखालील क्षेत्रात 0.11  लाख हेक्टरची वाढ झाली असून, यात प्रामुख्याने बिहारचा (0.11  लाख हेक्टर) वाटा आहे.

कापूस: गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील 108.26  लाख हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत, यावर्षी सुमारे 107.30 लाख हेक्टर क्षेत्रात कापसाची लागवड झाली आहे. म्हणजेच यात सुमारे 0.96 लाख हेक्टरची घट झाली आहे. लागवडीखाली आलेल्या क्षेत्रात प्रामुख्याने राजस्थान (1.09 लाख हेक्टर), हरियाणा (0.90 लाख हेक्टर), पंजाब (0.43  लाख हेक्टर), महाराष्ट्र (0.38 लाख हेक्टर), कर्नाटक (0.10 लाख हेक्टर), उत्तर प्रदेश (0.05  लाख हेक्टर) आणि ओडिशा (0.01 लाख हेक्टर) या राज्यांमध्ये घट दिसून आली आहे. तर, तेलंगणा (1.25  लाख हेक्टर), गुजरात (0.64 लाख हेक्टर), मध्य प्रदेश (0.11 लाख हेक्टर) आणि आंध्र प्रदेश (0.02 लाख हेक्टर) या राज्यांमध्ये कापूस लागवडीखालील  क्षेत्रात वाढ नोंदवण्यात आली आहे.

 

* * *

सुवर्णा बेडेकर/तुषार पवार/सविता म्‍हस्‍कर/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2300682) आगंतुक पटल : 10
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu