पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्री अरविंद यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन केले

Posted On: 15 AUG 2026 10:09AM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज श्री अरविंद यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन केले. एक उत्तुंग विचारवंत, राष्ट्रवादी, कवी आणि तत्त्वज्ञ असलेल्या श्री अरविंद यांनी आपले जीवन भारताच्या स्वातंत्र्यासाठी तसेच मानवी प्रगतीच्या व्यापक ध्येयासाठी समर्पित केले, असे ते म्हणाले.

विविध विषयांवरील त्यांचे साहित्य जगभरातील पिढ्यांना प्रेरणा देत आहे, असे पंतप्रधानांनी नमूद केले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या राष्ट्राच्या भविष्यावरील आणि मानवी परिवर्तनाच्या असीम शक्यतांवरील श्री अरविंद यांचा विश्वास आजही तितकाच प्रासंगिक आहे असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले.

‘एक्स’वरील एका पोस्टमध्ये पंतप्रधानांनी लिहिलेः

"श्री अरविंद यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे स्मरण करत आहे. एक उत्तुंग विचारवंत, राष्ट्रवादी, कवी आणि तत्त्वज्ञ असलेल्या श्री अरविंद यांनी आपले जीवन भारताच्या स्वातंत्र्यासाठी तसेच मानवी प्रगतीच्या व्यापक ध्येयासाठी समर्पित केले. विविध विषयांवरील त्यांचे साहित्य जगभरातील पिढ्यांना प्रेरणा देत आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, आपल्या राष्ट्राच्या भविष्यावरील आणि मानवी परिवर्तनाच्या असीम शक्यतांवरील त्यांचा विश्वास आजही अत्यंत प्रासंगिक आहे."

***

नितीन फुल्लुके/शैलेश पाटील/परशुराम कोर 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2299778) अभ्यागत कक्ष : 53