संरक्षण मंत्रालय
आत्मनिर्भर भारत: संरक्षण मंत्रालयाने भारतीय लष्करासाठी लॉयटर म्युनिशन सिस्टीम्स खरेदी करण्यासाठी 1,577 कोटी रुपयांचे करार केले
Posted On:
14 AUG 2026 7:33PM by PIB Mumbai
संरक्षण मंत्रालयाने भारतीय लष्करासाठी शस्त्रात्रे आणि इतर उपकरणांसह लॉयटर म्युनिशन सिस्टीमच्या खरेदीसाठी टाटा ॲडव्हान्स्ड सिस्टीम्स लिमिटेड आणि निबे प्रायव्हेट लिमिटेड यांच्यासोबत अंदाजे 1,577 कोटी रुपये खर्चाचे करार केले आहेत. नवी दिल्ली येथे संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह यांच्या उपस्थितीत 14 ऑगस्ट 2026 रोजी या करारांवर स्वाक्षरी करण्यात आली.


लॉयटर म्युनिशन सिस्टीम हे तोफखाना रेजिमेंटची क्षमता वाढवण्यासाठी विकसित केलेले एक महत्त्वपूर्ण उपकरण आहे, यामुळे भारतीय लष्कराची एकूण परिचालन आणि कार्यक्षमता अधिक मजबूत होण्यास मदत होणार आहे. ही प्रणाली जलदगती प्रक्रियेद्वारे 'बाय (इंडियन)' श्रेणीअंतर्गत खरेदी केली जात असल्याने, भारतीय उद्योगाच्या उत्पादन क्षमतेला बळकटी मिळेल.
संरक्षण उत्पादनांची ही खरेदी भारतीय संरक्षण उद्योगांचे आधुनिकीकरण आणि सक्षमीकरण करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे, यामुळे भारतीय संरक्षण उद्योग ‘आत्मनिर्भर भारत’चा अभिमानाने ध्वजवाहक म्हणून पुढे येण्यास मदत होईल.
***
शैलेश पाटील/भक्ती सोनटक्के/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2299701)
अभ्यागत कक्ष : 49