आयुष मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

होमिओपॅथी डॉक्टरांनी औषधोपचाराच्या इतर पद्धतींचा वापर करण्याबाबतच्या नियामक भूमिकेचे राष्ट्रीय होमियोपॅथी आयोगाकडून स्पष्टीकरण

प्रविष्टि तिथि: 14 AUG 2026 8:16PM by PIB Mumbai

 

होमिओपॅथी डॉक्टरांनी औषधोपचाराच्या इतर पद्धतींचा वापर करण्याबाबत राष्ट्रीय होमिओपॅथी आयोग -  एनसीएचने आपली नियामक भूमिका स्पष्ट केली आहे. इतर औषधोपचार पद्धतींचा वापर करताना लागू असलेल्या तरतुदी अचूक व योग्य नियामक संदर्भात समजून घेतल्या जातील आणि त्यांची नोंद घेतली जाईल याबाबत खात्री करण्याचा उद्देश यामागे आहे.

होमिओपॅथी डॉक्टरांच्या व्यावसायिक वागणुकीबाबत एनसीएचच्या 2022 च्या नियमातील कलम 36(वाय) नुसार, होमिओपॅथी डॉक्टरांनी होमिओपॅथीव्यतिरिक्त इतर कोणत्याही औषधोपचार पद्धतीचा वापर करू नये. या तरतुदीत असेही स्पष्ट केले आहे की, राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम किंवा केंद्र अथवा राज्य सरकारच्या कोणत्याही कार्यक्रमांतर्गत इतर औषधोपचार पद्धतींचा वापर करण्यापासून कोणत्याही होमिओपॅथी डॉक्टरला प्रतिबंध करीत नाही; मात्र, संबंधित डॉक्टरने सक्षम प्राधिकाऱ्याद्वारे मान्यताप्राप्त किंवा विहित प्रशिक्षण अथवा अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा, अशी अट लागू आहे.

एनसीएचने राष्ट्रीय होमिओपॅथी आयोगाच्या (होमिओपॅथी पदवी अभ्यासक्रम – बॅचलर ऑफ होमिओपथिक मेडिसिन ॲण्ड सर्जरी (बीएचएमएस)  नियमन,  2022 च्या कलम 14 अंतर्गत उपकलम (7) कडे लक्ष वेधले आहे. या उपकलमानुसार, सरकारी आरोग्य सुविधा आणि राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांमध्ये होमिओपॅथी वैद्यकीय पदवीधरांच्या भूमिकेला मान्यता देते.

 कलम 36(वाय)च्या तरतुदी अचूक आणि त्यांच्या योग्य नियामक संदर्भात समजून घेतल्या जातील आणि त्यांची योग्यरित्या नोंद घेतली जाईल, यासाठी एनसीएचने हे स्पष्टीकरण जारी केले आहे.

 सविस्तर स्पष्टीकरणासाठी इथे क्लिक करा -

*** 

शैलेश पाटील/रेश्मा बेडेकर/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2299698) आगंतुक पटल : 7
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu