लोकसभा सचिवालय
देशाच्या 80 व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी देशाच्या जनतेला दिल्या शुभेच्छा
Posted On:
14 AUG 2026 6:47PM by PIB Mumbai
लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी देशाच्या 80 व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला देशाच्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.
लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांचा संदेश :
माझ्या प्रिय देशवासीयांनो, 80 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
आजचा दिवस देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित करणाऱ्या अगणित स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण करण्याचा दिवस आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून जवळपास आठ दशके उलटून गेली आहेत, आणि आज आपण एका नव्या संकल्पासह - आपल्या युवा शक्तीच्या सामर्थ्याने प्रत्येक क्षेत्रात जगाचे नेतृत्व करणारा देश घडवण्याच्या संकल्पासह उभे आहोत.
आपल्या देशातील सुमारे 65 टक्के लोकसंख्या 35 वर्षांपेक्षा कमी वयाची आहे. आपला युवा वर्ग शिक्षण आणि विज्ञानाच्या क्षेत्रात देशाला पुढे नेण्याचे काम करत आहेत.
आज देशातील प्रत्येक युवा प्रतिनिधीने त्यांच्या जीवनात आपल्या संविधानात्मक आणि लोकशाही मूल्यांचा अंगीकार करणे अत्यंत गरजेचे आहे. आपल्या युवा वर्गाने त्यांची स्वप्ने भारताच्या विकासाशी जोडायला हवीत आणि आपल्या कर्तव्यांची पूर्तता हे राष्ट्र उभारणीचे माध्यम बनवायला हवे. या स्वातंत्र्यदिनी आपण सर्वांनी समर्थ, आत्मनिर्भर आणि विकसित भारताच्या उभारणीत आपापली भूमिका बजावण्याचा संकल्प करू या. याच संदेशासह, मी तुम्हा सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या पुन्हा एकदा मनःपूर्वक शुभेच्छा देतो.
जय हिंद! जय भारत.
***
शैलेश पाटील/तुषार पवार/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2299603)
अभ्यागत कक्ष : 44