पंतप्रधान कार्यालय
आयुष्यातील आव्हानांवर मात करण्यासाठी दृढ निर्धार , चिकाटी आणि सातत्यपूर्ण प्रयत्न अधोरेखित करणारे एक संस्कृत सुभाषित पंतप्रधानांनी केले सामायिक
Posted On:
13 AUG 2026 7:37AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज एक संस्कृत सुभाषित सामायिक केले, ज्यामध्ये आयुष्यातल्या आव्हानांवर मात करण्यासाठी आणि प्रतिकूल परिस्थितीला अनुकूल परिस्थितीमध्ये बदलण्यासाठी दृढ निर्धार , चिकाटी आणि धैर्याची शक्ती अधोरेखित केली आहे.
पंतप्रधानांनी X वर लिहिले;
"दैवं पुरुषकारेण यः समर्थः प्रबाधितुम्।
न दैवेन विपन्नार्थः पुरुषः सोऽवसीदति॥"
ज्या व्यक्तीकडे प्रतिकूल परिस्थितीला अनुकूल परिस्थितीमध्ये बदलण्याचा दृढ निर्धार , चिकाटी आणि धैर्य असते , ती व्यक्ती आयुष्यातील आव्हानांमुळे डगमगत नाही, कधीही पराभूत होत नाहीत. त्याउलट ,सातत्यपूर्ण प्रयत्न आणि दृढ संकल्पासह पुढे जाते आणि शेवटी यश मिळवते.
***
NehaKulkarni / SushamaKane / DineshYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2298748)
अभ्यागत कक्ष : 43
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Bengali-TR
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam