सहकार मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

‘भारत टॅक्सी’चा प्रारंभ

प्रविष्टि तिथि: 12 AUG 2026 9:35PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 12 ऑगस्‍ट 2026

 

सहकार टॅक्सी को-ऑपरेटिव्ह लिमिटेड (एसटीसीएल) या बहुराज्यीय सहकारी संस्थेद्वारे संचालित डिजिटल ॲप-आधारित परिवहन सेवा ‘भारत टॅक्सी’चा दिल्ली राष्ट्रीय राजधानी प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र आणि राजस्थानमधील शहरांमध्ये अधिकृत सुरुवात झाली आहे.

भारत टॅक्सी सेवेची अंमलबजावणी देशभरात टप्प्याटप्प्याने करण्यात येत आहे. या अंमलबजावणीत सारथी अर्थात वाहनचालकांची नोंदणी व सेवा मंचावर त्यांना सहभागी करून घेणे, ग्राहकांची नोंदणी, प्रशिक्षण कार्यक्रम तसेच निश्चित करण्यात आलेल्या शहरांमध्ये आणि राज्यांमध्ये सेवांच्या विस्ताराचा समावेश आहे. दिनांक 04.08.2026 पर्यंत या सेवा मंचावर 8.48 लाख सारथी आणि 44.27 लाख ग्राहकांची नोंदणी झाली आहे. या माध्यमातून दररोज 11,106 फेऱ्या उपलब्ध करून दिल्या जात असून, सारथींनी एकूण 83.70 कोटी रुपये कमावले आहेत.

एसटीसीएलद्वारे संचालित भारत टॅक्सी सेवा इतर शहरांमध्ये आणि राज्यांमध्ये सुरू करण्याची प्रक्रिया ही कार्यान्वयनाच्या गरजा आणि आवश्यक विविध परवानग्या मिळविण्यावर अवलंबून आहे. विस्तार करताना कार्यान्वयनाची तयारी, सारथींची उपलब्धता, वैधानिक आवश्यकता पूर्ण करणे तसेच संबंधित राज्य सरकारे, सहकारी संस्था आणि इतर भागधारकांशी समन्वय यांसारख्या घटकांचा विचार केला जातो.

विविध शहरांमध्ये भारत टॅक्सीच्या कार्यान्वयनाचा तपशील आणि दिनांक 04.08.2026 पर्यंत दररोजच्या सरासरी फेऱ्यांची संख्या पुढीलप्रमाणे आहे –

शहर/राज्य

दैनंदिन सरासरी

दिल्ली राष्ट्रीय राजधानी प्रदेश

5574

गुजरात

3817

लखनौ

324

चंदिगढ

190

मुंबई

197

जयपूर

372

पुणे

632

एकूण

11,106 

 

भारत टॅक्सी आणि यात्री साथी हे वेगवेगळ्या संस्थात्मक चौकटींतर्गत कार्यरत असलेले स्वतंत्र परिवहन मंच आहेत. भारत टॅक्सी हा बहुराज्यीय सहकारी संस्था अधिनियम, 2002 मधील तरतुदींनुसार सहकार एसटीसीएलद्वारे संचालित सहकारी तत्त्वावर आधारित मंच आहे; तर यात्री साथी हा पश्चिम बंगाल सरकारच्या माहिती तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक्स विभागाद्वारे विकसित आणि संचालित मंच आहे.

19 जुलै 2026 रोजी एसटीसीएलने यात्री साथी मंचाबरोबर सहयोगासाठी पश्चिम बंगाल सरकारसह सामंजस्य करार केला. या सामंजस्य करारांतर्गत, भारत टॅक्सी वाहन चालक नोंदणी, सहकारी संस्थेचे सदस्यत्व, चालकांचे कल्याण आणि जनसंपर्क या क्षेत्रांमध्ये सहकार्य करते.

ही माहिती केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री  अमित शाह यांनी राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली आहे.

 

* * *

निलिमा चितळे/रेश्मा बेडेकर/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2298685) आगंतुक पटल : 22
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Telugu