महिला आणि बालविकास मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

मुलांच्या सुरक्षित वातावरणात देखभालीसाठी मंत्रालयाने ‘पाळणा’अंतर्गत उपलब्ध करून दिली अंगणवाडीसह पाळणाघराची सुविधा

प्रविष्टि तिथि: 12 AUG 2026 6:30PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 12 ऑगस्‍ट 2026

 

मंत्रालयाने 01 एप्रिल 2022 पासून ‘पाळणा’ योजनेअंतर्गत अंगणवाडीसह पाळणाघरे सुरू केली आहेत. या माध्यमातून सर्व मातांच्या 6 महिने ते 6 वर्षे वयोगटातील मुलांना सुरक्षित वातावरणात दिवसभर देखभाल मिळेल अशी सुविधा उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट आहे. या सुविधेचा वापर करण्यासाठी मातेच्या रोजगाराचा निकष विचारात घेण्याची गरज नाही. पाळणाघराबरोबर मुलांना पोषण व वाढीसाठी सहाय्य, आरोग्य सेवा, त्यांच्या विकास व वाढीचे निरीक्षण, लसीकरण, शिक्षण इत्यादी सुविधा देखील उपलब्ध करून दिल्या जात आहेत. ‘शक्ती अभियाना’च्या ‘सामर्थ्य’ या घटकांतर्गत ‘पाळणा’ ही केंद्र पुरस्कृत योजना आहे. या योजनेची अंमलबजावणी केंद्र सरकार आणि राज्य सरकारे व केंद्रशासित प्रदेश (विधीमंडळ असलेले) यांच्यामार्फत 60:40 या निधीच्या प्रमाणात केली जाते. मात्र, ईशान्येकडील राज्ये आणि विशेष श्रेणीतील राज्यांसाठी हे प्रमाण 90:10 आहे. विधिमंडळ नसलेल्या केंद्रशासित प्रदेशांसाठी 100% निधी केंद्र सरकारकडून उपलब्ध करून दिला जातो. राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना अर्थ मंत्रालयाच्या व्यय विभागाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, योजनेअंतर्गत निधी सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन व्यवस्थेच्या सिंगल नोडल एजन्सी एसएनए-स्पर्श प्रणावीद्वारे वितरित केला जातो. सध्या, देशभरात एकूण 4,172 अंगणवाडीसह पाळणाघरे कार्यरत आहेत.

कामगार व रोजगार मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, मातृत्व लाभ अधिनियम, 1961 मधील तरतुदी सामाजिक सुरक्षा संहिता, 2020 मध्ये समाविष्ट करण्यात आल्या आहेत. ही संहिता 21.11.2025 रोजी लागू झाली. सामाजिक सुरक्षा संहिता, 2020 मधील कलम 67 नुसार 50 किंवा त्यापेक्षा अधिक कर्मचारी असलेल्या आस्थापनांसाठी पाळणाघराच्या सुविधेची तरतूद करण्यात आली आहे. या संहितेनुसार, राज्य क्षेत्रातील आस्थापनांच्या संदर्भातील अंमलबजावणीची जबाबदारी संबंधित राज्य सरकारांची आहे. केंद्रीय क्षेत्रातील आस्थापनांमध्ये मातृत्व लाभाच्या तरतुदींचे अनुपालन निश्चित करण्यासाठी कामगार आणि रोजगार मंत्रालयाच्या अंतर्गत मुख्य कामगार आयुक्त (केंद्रीय) संघटना हे नियुक्त अंमलबजावणी प्राधिकरण आहे.

ही माहिती महिला आणि बाल विकास राज्यमंत्री सावित्री ठाकूर यांनी राज्यसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात दिली.

 

* * *

निलिमा चितळे/रेश्मा बेडेकर/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2298512) आगंतुक पटल : 19
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी