आयुष मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

सार्वजनिक आरोग्यामध्ये योग आणि निसर्गोपचाराचा प्रसार

प्रविष्टि तिथि: 11 AUG 2026 5:28PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 11 ऑगस्ट 2026

आयुष वैद्यकीय पद्धतींचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी, तसेच मोठ्या प्रमाणावर लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी, आयुष मंत्रालय 'माहिती, शिक्षण आणि संवाद' (आयईसी) ही योजना राबवत आहे.  त्याअंतर्गत विविध जनजागृती उपक्रम आणि  कार्यक्रम आयोजित केले जातात. मंत्रालय, या योजनेअंतर्गत योग आणि निसर्गोपचारासह आयुषच्या सर्व पद्धतींचे प्रतिनिधित्व करणारे राष्ट्रीय/राज्यस्तरीय 'आरोग्य मेळे' आयोजित करते, तसेच 'योग महोत्सव' साजरा करते आणि आयुष प्रणालीशी संबंधित महत्त्वाचे दिवस साजरे करते. यामध्ये दरवर्षी 21 जून रोजी साजरा केला जाणारा 'आंतरराष्ट्रीय योग दिन' येतो. याव्यतिरिक्त, निसर्गोपचाराची तत्त्वे - पद्धती आणि निरोगी जीवनशैली तसेच आरोग्याला चालना देण्यात त्याची भूमिका यांबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी 18 नोव्हेंबर रोजी 'निसर्गोपचार दिन' साजरा केला जातो.

योग आणि निसर्गोपचाराला प्रोत्साहन देणाऱ्या राष्ट्रीय कार्यक्रमांचा तपशील आणि त्यावर झालेला खर्च 'परिशिष्ट-1' मध्ये जोडला आहे. या कार्यक्रमांमधील लाभार्थ्यांचा सहभाग केवळ प्रत्यक्ष उपस्थितीपुरता मर्यादित नसून, विविध समाज माध्‍यमांवर तसेच डिजिटल माध्यमांतूनही त्यांना सहभागी करून घेतले जाते, त्यामुळे  लोकांपर्यंत व्यापक पोहोच निश्चित होते.

परिशिष्ट-1

योग आणि निसर्गोपचाराला चालना देणाऱ्या कार्यक्रमांवरील खर्चाचा तपशील खालीलप्रमाणे आहे:

International Day of Yoga

S. No.

F.Y.

Expenditure Incurred

(in Crores)

  1.  

2023-24

24.16

  1.  

2024-25

16.45

  1.  

2025-26

57.38

                            National Level Arogya Fair

  1.  

2023-24

3.60

  1.  

2024-25

0.90

  1.  

2025-26

1.80

                               State Level Arogya Fair

  1.  

2023-24

0.35

  1.  

2024-25

1.02

  1.  

2025-26

0.70

                                   Yoga Parv/Fest

  1.  

2023-24

-

  1.  

2024-25

0.29

  1.  

2025-26

0.20

Naturopathy Day

  1.  

2023-24

1.33

  1.  

2024-25

0.23

  1.  

2025-26

0.60

ही माहिती आयुष मंत्रालयाचे केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) प्रतापराव जाधव यांनी आज राज्यसभेत एका लेखी उत्तरात दिली.
 
सुवर्णा बेडेकर/पर्णिका हेदवकर/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 

 


(रिलीज़ आईडी: 2297843) आगंतुक पटल : 19
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali