गृह मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता,‌ 2023 अंतर्गत ई -एफआयआरची तरतूद

प्रविष्टि तिथि: 11 AUG 2026 6:32PM by PIB Mumbai

 नवी दिल्ली, 11 ऑगस्ट 2026

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (बीएनएसएस), 2023 च्या कलम 173 मध्ये इतर गोष्टींबरोबरच अशी तरतूद आहे की दखलपात्र गुन्ह्यासंबंधीची प्रत्येक माहिती, गुन्हा कोठेही घडला असला तरी, पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्याला तोंडी किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे दिली जाऊ शकते आणि जर ती तोंडी दिली गेली तर ती त्याच्याद्वारे लेखी स्वरूपात आणली जाईल, ज्यावर माहिती देणाऱ्या व्यक्तीची स्वाक्षरी असेल. जर माहिती इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे दिली गेली तर माहिती देणाऱ्याने तीन दिवसांच्या आत त्यावर सही केल्यानंतर पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्याद्वारे त्याची नोंद घेतली जाईल. बीएनएसएस, 2023 मध्ये अशी तरतूद आहे की ई-एफआयआर किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे दिलेल्या माहितीची नोंद घेतली जाण्याच्या दृष्टीने माहिती देणाऱ्याने त्यावर तीन दिवसांच्या विहित कालावधीत सही करणे आवश्यक आहे.

केंद्रीय गृह राज्यमंत्री बंडी संजय कुमार यांनी लोकसभेतील एका प्रश्नाला लेखी उत्तर देताना ही माहिती दिली.


निलीमा चितळे/नंदिनी मथुरे/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 


(रिलीज़ आईडी: 2297826) आगंतुक पटल : 17
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Assamese , Telugu