पंतप्रधान कार्यालय
भारतातील आशियाई सिंहांच्या वाढत्या संख्येसंदर्भातला एक लेख पंतप्रधानांनी केला सामायिक
Posted On:
10 AUG 2026 4:03PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 10 ऑगस्ट 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी लिहिलेला एक लेख सामायिक केला. भारतातील आशियाई सिंहांची संख्या वाढत असून त्यांच्या अधिवासाचाही विस्तार होत असल्याचे या लेखात म्हटले आहे. वन्यजीव संवर्धनाप्रती सरकारची दृढ कटिबद्धता आणि त्याला मिळालेला लोकांचा भक्कम सहभाग, हे आपल्या वन्यजीवांचे रक्षण करण्याचे आणि आगामी पिढ्यांसाठी या प्रजातीचे जतन करण्याचे एक प्रेरणादायी उदाहरण आहे," असे मोदी यांनी म्हटले आहे.
मोदी यांनी आपल्या एक्स या समाजमाध्यमावर पोस्ट केले आहे की,
एक उल्लेखनीय पुनरुज्जीवन ! भारतातील आशियाई सिंहांची संख्या वाढत आहे आणि त्यांच्या अधिवासाचा विस्तार होत आहे.
वन्यजीव संरक्षणाप्रती सरकारची दृढ कटिबद्धता आणि त्याला मिळालेला लोकांचा भक्कम सहभाग, हे आपल्या वन्यजीवांचे रक्षण करण्याचे आणि आगामी पिढ्यांसाठी त्यांचे संवर्धन करण्याचे एक प्रेरणादायी उदाहरण आहे.
केंद्रीय मंत्री @byadavbjp यांचा हा माहितीपूर्ण लेख वाचा.
निलीमा चितळे/राजेश शिरभाते/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2297142)
अभ्यागत कक्ष : 46
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Bengali-TR
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam